Karnataka Priest Attack : पुत्तूरु (कर्नाटक) येथे पाद्य्राकडून वृद्धाला मारहाण !
पुत्तूरु (कर्नाटक) – येथील मनेल चर्चच्या एका प्रमुख पाद्य्राने एका वृद्धाला त्याच्याच घरात मारहाण केल्याची घटना २९ फेब्रुवारी या दिवशी घडली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
पुणच गावातील एर्मेतड्का येथील निवासी ग्रेगरी मोंटेरो (वय ७९ वर्षे) यांच्या घरी पाद्री नेल्सन ऑलिव्हेरा घर शुद्धीनिमित्त आला होता. त्या वेळी पाद्री नेल्सन याने ‘वृद्ध व्यक्ती चर्चला काही देणगी देऊन सहकार्य करत नाही’, असे सांगून वृद्धाला अर्वाच्य शिव्या दिल्या. तसेच मोंटेरा यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना ओढले आणि मारहाण केली.
#NelsonOlivera, a #Mangalore #Catholicpriest, viciously beats an elderly couple of the #Church in #Vitla. A video of this has gone viral on social media. Priest Nelson Olivera is shown aggressively attacking the elderly couple and kicking the elderly woman #BREAKINGNEWS pic.twitter.com/QrSI1a7uHq
— Headline Karnataka (@hknewsonline) March 2, 2024
विशेष म्हणजे यापूर्वी तलपाडी, संपिके चर्चमध्ये याच पाद्य्राने असेच वर्तन केले होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. (जर तेव्हाच या पाद्य्रावर कारवाई झाली असती, तर आताची घटना घडली नसती ! – संपादक)
An old man beaten up by a pastor in Karnataka !
📍Manela, Putturu, Mangaluru
Pastors are depicted as civilized and cultured personalities in films; however, their true conduct is evident from incidents both within the country and abroad!#NoConversionpic.twitter.com/VTqRKp8vsE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 3, 2024
संपादकीय भूमिकापाद्री म्हणजे सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तीमत्त्व असे चित्रपटांतून दाखवण्यात येते; मात्र प्रत्यक्ष ते कसे वागतात, हे देश आणि विदेश यांतील घटनांतून लक्षात येते ! |