Allahabad HC Rejects Protection : हिंदु व्यक्तीसमवेत विवाहाविना रहाणार्‍या मुसलमान विवाहितेला अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुरक्षा नाकारली !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – विवाहित मुसलमान महिला शरीयतनुसार कोणत्या अन्य व्यक्तीसमवेत किंवा हिंदु व्यक्तीसमवेत राहू शकत नाही. शरीयतनुसार, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये (विवाह न करता एकत्र) रहाणे व्यभिचार आणि ‘हराम’ (इस्लामविरोधी) आहे, असे सांगत अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका हिंदु व्यक्तीसमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या एका मुसलमान विवाहित महिलेला सुरक्षा पुरवण्यास नकार दिला. या महिलेने तिला आणि तिच्या प्रियकराला धोका असल्याचे म्हटले होते. तिचे वडील आणि नातेवाईक त्यांचे बरेवाईट करू शकत असल्याने तिने सुरक्षेची मागणी केली होती.

न्यायमूर्ती रेनू अग्रवाल यांच्या पिठाने म्हटले की, महिलेने धर्म परिवर्तनासाठी कोणताही अर्ज केला नाही किंवा पतीपासून वेगळी झालेली नाही. त्यामुळे तिला संरक्षण दिले जाऊ शकत नाही. महिलेने पतीपासून तलाक घेतल्याचा कोणताही कायदेशीर पुरावा मिळवलेला नाही. तरी महिला लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये रहात आहे.