नायगाव येथे शाळेच्या बसची दोन सख्ख्या बहिणींना धडक !
२ वर्षांच्या मुलीची प्रकृती चिंताजनक
नायगाव – विद्यार्थ्यांना शाळेतून घरी घेऊन जाणार्या एका शाळेच्या बसने दोन सख्ख्या बहिणींना धडक दिली. त्यामुळे त्या गाडीखाली आल्या. यात दोन्ही मुलींना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दोघींवर अतीदक्षता विभागात उपचार चालू असून २ वर्षांच्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात चित्रीत झाली आहे. या दोन्ही मुलींचे वय अनुक्रमे २ आणि ६ वर्षे असे आहे. दोन्ही मुली बसच्या चाकाखाली आल्याने आरडाओरड झाल्यानंतर चालकाने तात्काळ बस थांबवली.