बंगाल सरकारविरोधात भाजपची ठाणे आणि कल्याण येथे निदर्शने !
महिलांवर अत्याचार करणार्या शाहनवाज शेखच्या छायाचित्राला जोडे मारले !
ठाणे, २ मार्च (वार्ता.) – बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल सरकारच्या विरोधात ठाणे आणि कल्याण जिल्हा भाजपच्या वतीने १ मार्चला निदर्शने करण्यात आली. महिलांवर अत्याचार करणार्या शाहनवाज शेख याला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. बंगालमध्ये शाहनवाज शेखच्या महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर येऊनही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्याला पाठीशी घालत असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले. या वेळी भाजपच्या महिला पदाधिकार्यांकडून शाहनवाज शेखच्या छायाचित्राला जोडे मारण्यात आले.