तंजावर (तमिळनाडू) येथील श्री भीमस्वामी शहापूरकर मठात साजरा होणार ३४२ वा ‘दासनवमी महोत्सव’ !
सातारा – तंजावर (तमिळनाडू) येथील श्री भीमस्वामी शहापूरकर मठात ४ मार्च २०२४ या दिवशी ३४२ वा ‘दासनवमी महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती तंजावर येथील ‘श्री भीमस्वामी शहापूरकर मठा’चे मठाधिपती पू. रामचंद्र महाराज शहापूरकर यांनी दिली.
तंजावर येथील कोट-किल्ला दक्षिण राज बिदिंत श्री भीमस्वामी महाराज शहापूरकर मठात एक दिवसीय श्री समर्थ रामदासस्वामी यांचा ३४२ वा आराधना पुण्यतिथी महोत्सव अर्थात ‘दासनवमी महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. या वेळी प्रभु श्रीरामचंद्राच्या मूर्तीची पूजा-अर्चा, महाभिषेक, सांप्रदायिक भिक्षा आणि महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी दैनंदिन उपासना, भजन श्रींचे निर्याण कीर्तन वर्णन होईल. आरती आणि प्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. तरी समस्त श्री समर्थ रामदासस्वामी भक्तांनी महोत्सवास उपस्थित राहून या महोत्सवाची शोभा वाढवावी. मठात वर्षभर होणारे सर्व कार्यक्रम भिक्षेवरच चालतात. त्यामुळे समर्थभक्तांनी ‘गुगल पे’द्वारे 80153 04849 या भ्रमणभाष क्रमांकावर किंवा बँक ऑफ महाराष्ट्र S.B. A/C No. 60288342483 (IFSC Code : MAHB0001771) अधिकोषातील या बचत खात्यावर यथाशक्ती देणगी द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.