स्त्रियांनी ‘हेवी मेकअप’ (गडद रंगभूषा) केल्याने त्यांच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘सध्या बहुतांश स्त्रियांचा कल आकर्षक दिसण्याकडे असल्याने त्या पेठेत उपलब्ध असलेल्या नानाविध सौंदर्यप्रसाधनांचा वापर करून रंगभूषा (मेकअप) करतात. एखाद्या समारंभाला जायचे असल्यास स्त्रिया ‘हेवी मेकअप’ (गडद रंगभूषा) करतात. स्त्रियांनी ‘हेवी मेकअप’ (गडद रंगभूषा) केल्याने त्यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी  ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.


१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत आध्यात्मिक त्रास असलेली १ स्त्री आणि आध्यात्मिक त्रास नसलेली १ स्त्री यांनी गडद रंगभूषा करण्यापूर्वी अन् केल्यानंतर त्यांची निरीक्षणे करण्यात आली. या चाचणीत दोघींच्या चारही बाजूंनी म्हणजे पुढून, मागून, डावीकडून आणि उजवीकडून ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या निरीक्षणांच्या तुलनात्मक अभ्यासातून गडद रंगभूषा केल्याने त्यांच्या चारही बाजूंनी वातावरणात प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यात आला. गडद रंगभूषा केल्याने चाचणीतील स्त्रियांवर झालेले परिणाम पुढे दिले आहेत.

सौ. मधुरा कर्वे

१ अ.  गडद रंगभूषा केल्याचा दोन्ही स्त्रियांवर पुष्कळ नकारात्मक परिणाम होणे

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. आध्यात्मिक त्रास असलेल्या स्त्रीने रंगभूषा केल्यानंतर तिच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली.

२. आध्यात्मिक त्रास नसलेल्या स्त्रीने रंगभूषा केल्यानंतर तिच्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन सकारात्मक ऊर्जा न्यून झाली.

३. रंगभूषा केल्यानंतर दोघींच्या पुढील बाजूपेक्षा मागील बाजूने आणि डाव्या बाजूपेक्षा उजव्या बाजूने अधिक प्रमाणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.

४. दोघींवर रंगभूषा केल्याचा परिणाम २ घंटे टिकला.

२. निष्कर्ष

‘स्त्रियांनी गडद रंगभूषा (हेवी मेकअप) करणे आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक आहे’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

३ अ. चाचणीतील स्त्रियांनी गडद रंगभूषा केल्याने त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होण्याचे कारण : चाचणीतील स्त्रियांनी गडद रंगभूषा करण्यासाठी त्यांच्याकडे असलेली (नामांकित आस्थापनांची) विविध सौंदर्यप्रसाधने (cosmetics) अन् साहित्य, उदा. ‘कॉम्पॅक्ट पावडर’ (compact powder) (तोंडवळ्यावर लावायची भुकटी), ‘ब्लशर’ (blusher) (गालांना लाली आणण्यासाठी वापरण्यात येणारे प्रसाधन), ‘लिपस्टिक’ (lipstick) (ओठ आकर्षक दिसावे यासाठी वापरण्यात येणारे प्रसाधन), ‘मस्करा’ (mascara) (डोळ्यांच्या पापण्यांचे केस आकर्षक दिसावे यासाठी वापरण्यात येणारे प्रसाधन), ‘आय शॅडो’ (eye shadow) (डोळ्यांच्या पापण्याची त्वचा रंगवण्यासाठीचे प्रसाधन), ‘मूस’ (mousse) (केशरचनेसाठी वापरण्यात येणारे प्रसाधन), ‘नेलपेंट’ (nailpaint) (हातापायांची नखे आकर्षक दिसण्यासाठी वापरण्यात येणारे प्रसाधन), ‘परफ्यूम’ (perfume) (कपड्यांवर फवारण्याचे सुगंधी रसायन) आणि ‘पावडर ब्रश’ (powder brush) (रंगभूषा करण्यासाठी वापरण्यात येणारे प्रसाधन-साहित्य) इत्यादी वापरले. त्यांनी रंगभूषा करण्यासाठी वापरलेली सौंदर्यप्रसाधने आणि साहित्य यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा (त्रासदायक स्पंदने) असल्याचे चाचणीतील निरीक्षणांतून दिसून आले. (सौंदर्यप्रसाधने आणि साहित्य यांच्या संदर्भातील सविस्तर संशोधन निराळ्या लेखात दिले आहे.) त्रासदायक स्पंदनांनी युक्त सौंदर्यप्रसाधनांचा वापर करून केलेल्या रंगभूषेमुळे दोघींवर काळ्या शक्तीचे (त्रासदायक स्पंदनांचे) आवरण आले. तसेच त्यांच्यातील सकारात्मक स्पंदने अल्प किंवा नाहीशी झाली. रंगभूषेचा दोघींवर पुष्कळ नकारात्मक परिणाम होऊन तो २ घंटे टिकून राहिला. यातून ‘स्त्रियांनी रंगभूषा (मेकअप) करणे आध्यात्मिकदृष्ट्या किती हानीकारक आहे’, हे लक्षात येते. (‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि नसलेल्या अन्य ८ ते १० स्त्रियांवर रंगभूषेच्या संदर्भात केलेल्या चाचण्यांतूनही असेच दिसून आले. यांतील काही स्त्रिया भारतीय आहेत, तर काही विदेशी आहेत; पण त्यांच्यावर झालेला परिणाम मात्र सारखाच आहे.)

३ आ. गडद रंगभूषा केल्यानंतर दोघींच्या पुढील बाजूपेक्षा मागील बाजूने आणि डाव्या बाजूपेक्षा उजव्या बाजूने अधिक नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे कारण : रंगभूषा करण्यापूर्वी चाचणीतील दोन्ही स्त्रियांच्या पुढून, मागून, डावीकडून आणि उजवीकडून केलेल्या निरीक्षणांतून त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून सकारात्मक ऊर्जा आढळली. त्यांनी रंगभूषा केल्यानंतर त्यांच्या पुढून, मागून, डावीकडून आणि उजवीकडून केलेल्या निरीक्षणांतून त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा अल्प किंवा नाहीशी झाल्याचे आढळले. दोघींच्या पुढील बाजूपेक्षा मागील बाजूने आणि डाव्या बाजूपेक्षा उजव्या बाजूने अधिक प्रमाणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली. याचे कारण हे की, व्यक्तीची पुढील बाजू सगुण, तर मागील बाजू निर्गुण आहे. सगुणापेक्षा निर्गुण प्रभावी असल्याने व्यक्तीच्या पुढील बाजूपेक्षा मागील बाजूने अधिक प्रमाणात स्पंदने प्रक्षेपित होतात. व्यक्तीच्या शरिराच्या उजव्या भागावर सूर्यनाडीचा (पिंगला नाडीचा) आणि डाव्या भागावर चंद्रनाडीचा (ईडा नाडीचा) प्रभाव असतो. चंद्रनाडी शीतल, तर सूर्यनाडी प्रखर आहे. त्यामुळे शरिराच्या डाव्या भागापेक्षा उजव्या भागाकडून अधिक प्रमाणात शक्ती (ऊर्जा) प्रक्षेपित होते.

थोडक्यात, ‘स्त्रियांनी ‘मेकअप’ केवळ तोंडवळ्यावर केला असला, तरी त्यांच्या संपूर्ण ऊर्जाक्षेत्रावर (‘एनर्जी फिल्ड’वर) किती नकारात्मक परिणाम होतो’, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते. स्त्रिया ‘मेकअप’ करून समारंभात सहभागी होतात, तेव्हा त्यांच्याकडून चहुबाजूने प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक स्पंदनांमुळे तेथील वातावरणही दूषित होते. त्यामुळे समष्टीचीही आध्यात्मिकदृष्ट्या हानी होते.

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंतयु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंतया लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

४. स्त्रियांनो, बाह्य सौंदर्यापेक्षा ‘साधना’ करून स्वतःचे आध्यात्मिक सौंदर्य वाढवा !

सध्या बहुतांश स्त्रिया आकर्षक दिसण्यासाठी ‘मेकअप’ करणे यांसारख्या बाह्य सौंदर्य वाढवणार्‍या गोष्टींवर भर देतांना आढळतात. बाह्य सौंदर्य केवळ क्षणभंगुर सुख देते; पण त्याचा आध्यात्मिकदृष्ट्या काहीच लाभ होत नाही, उलट हानीच होते. त्यामुळे स्त्रियांनी बाह्य सौंदर्यापेक्षा ‘साधना’ (ईश्वरप्राप्तीसाठी म्हणजेच आनंदप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाचे प्रयत्न) करून स्वतःचे ‘आध्यात्मिक सौंदर्य’ वाढवणे श्रेयस्कर आहे. साधनेमुळे व्यक्तीतील काम-क्रोधादी षडरिपू दूर होतात, मनाची मलीनता दूर होऊन मन निर्मळ अन् सात्त्विक बनते. साधनेमुळे निर्माण होणारी सात्त्विकता व्यक्तीला आध्यात्मिक सौंदर्य बहाल करते. जसजशी व्यक्तीची साधना वाढते, तशतशी तिच्यातील सात्त्विकताही वाढते. त्यामुळे तिला भाव, चैतन्य, आनंद यांची अनुभूती येते. साधनेतील सातत्यामुळे ती ईश्वरी तत्त्वाशी जोडली जाते. स्त्रियांनी हिंदु संस्कृतीत सांगितलेल्या आचारधर्माचे पालन केल्यास (उदा. कपाळावर लाल गोल कुंकू लावणे, साडी परीधान करणे, वेणी किंवा अंबाडा घालणे, सात्त्विक अलंकार घालणे इत्यादी) त्यांची साधनेतील वाटचाल सुलभ आणि जलद होईल, तसेच जीवनातील प्रत्येक कृतीचे आध्यात्मिकरण (प्रत्येक कृतीतून साधना होईल अशा प्रकारे प्रत्येक कृती करणे) केल्यास साधना वृद्धींगत होईल. यामुळे स्त्रियांना स्वतःला आध्यात्मिक लाभ होईल. याचसमवेत कुटुंब आणि समाज यांनाही आध्यात्मिक लाभ होईल.

स्त्रियांनो, ‘आध्यात्मिक सौंदर्य हेच खरे सौंदर्य आहे’, हे लक्षात घेऊन आजच साधनेला आरंभ करा !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२.२.२०२१)

इ-मेल : mav.research2014@gmail.com

स्त्रियांनी बाह्य सौंदर्यापेक्षा ‘साधना’ करून स्वतःचे ‘आध्यात्मिक सौंदर्य’ वाढवणे श्रेयस्कर !
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.