ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने ब्राह्मण समाजाकडून गुन्हा नोंद करण्याची मागणी !
पुणे – वृत्तवाहिनीशी बोलतांना योगेश सावंत यांनी ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’ने केली आहे. यासंदर्भात महासंघाच्या वतीने गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांना निवेदन दिले. योगेश सावंत यांनी ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केले. राज्याचे उपमुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी एकेरी शब्दात टीका केली. सावंत यांच्या वक्तव्यामुळे खेडोपाडी रहात असलेल्या अल्पसंख्य ब्राह्मण कुटुंबांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सावंत यांच्यावर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महासंघाने केली आहे.