‘आयटीआय’मध्ये अल्पसंख्यांक आणि अनुसूचित जाती या दोन्ही सवलतींचा २५७ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ !
|
मुंबई, २ मार्च (वार्ता.) – वर्ष २०२३ मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेत आदिवासी प्रशिक्षणार्थींनी घेतलेल्या सवलतींच्या लाभामध्ये अनियमितता आढळली होती. त्याचे अन्वेषण करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचा अहवाल कौशल्यविकास आणि औद्योगिक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभा अन् विधान परिषद यांमध्ये मांडला. समितीने अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या १३ सहस्र ८५८ विद्यार्थ्यांची माहिती पडताळली. त्या वेळी २५७ विद्यार्थ्यांनी हिंदु धर्माव्यतिरिक्त इतर धर्म नोंदवल्याचे आढळून आले. ही गोष्ट गंभीर असून त्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
१. आदिवासी समाजातून धर्मांतर करून अल्पसंख्यांक आणि आदिवासी अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणारे विद्यार्थी असल्याचे निदर्शनास आले होते.
२. त्या अनुषंगाने लोढा यांनी सखोल चौकशी करण्याचे निर्देश नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दिले होते.
३. वरील सर्व २५७ विद्यार्थ्यांची माहिती घेण्यासाठी समिती संबंधित औद्योगिक प्रशासकीय संस्था, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, ग्रामसभा इत्यादी ठिकाणी भेट देऊन अहवाल सादर करेल.
४. ‘धर्म पालटला असेल, तर त्या विद्यार्थ्यांना मिळणार्या सवलती ग्राह्य धरल्या जातील का ? याविषयी समितीने सर्वंकष अभ्यास करून उपाययोजना सुचवाव्यात’, असा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra : Skill Development and Entrepreneurship Minister Mangalprabhat Lodha tables interim report in the Assembly.
257 tribal students converted to other religions, took benefits of the minority and scheduled caste reservations, to get admissions in 'Industrial Training… pic.twitter.com/oKFS8rnEn0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 2, 2024
संपादकीय भूमिकाअसा अपलाभ उठवणार्या विद्यार्थ्यांना कोणतीच सवलत देता कामा नये, असा आदेश सरकारने दिला पाहिजे ! |