काशी विश्वनाथ मंदिराच्या २ किलोमीटर परिघातील २६ मांसविकी करणार्या दुकानांवर कारवाई !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील काशी विश्वनाथ मंदिराच्या २ किलोमीटर परिघात मांसाची विक्री करणारी दुकाने बंद करण्यात आली आहेत. आठवडाभरापूर्वी याविषयी नोटीस बजावण्यात आली होती; मात्र नोटीस देऊनही दुकाने चालू होती. वाराणसीच्या बेनिया भागातील २६ दुकाने बंद करण्यात आली आहेत. महापालिकेची ही मोहीम सध्या चालू रहाणार आहे.
Action against 26 shops selling meat within 2 km radius of Kashi Vishwanath Mandir.
👉 Hindus think that the Central Government should make a Nationwide law banning the sale of meat and liquor within 2 kilometers of temples.#Varanasi pic.twitter.com/n13DJHYMEk
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 2, 2024
महापालिकेच्या १८ जानेवारी या दिवशी झालेल्या बैठकीत, महापालिका अधिनियम-१९५९ च्या कलम ९१(२) अन्वये, नगरसेवक इंद्रेश कुमार सिंह यांनी श्रीकाशी विश्वनाथ धामच्या आजूबाजूला असलेल्या मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला होता. काशी विश्वनाथ धामच्या २ किलोमीटर परिसरात मांसाच्या दुकानांवर बंदी घालण्यास सभागृहाने संमती दिली होती. या मोहिमेच्या अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणानंतर महापालिकेने पहिल्या टप्प्यात बेनियाबाग आणि न्यू रोड परिसरातील २६ दुकानांना नोटीस दिली होती.
संपादकीय भूमिकाकेंद्र सरकारनेच देशपातळीवर मंदिरांच्या २ किलोमीटर परिसरात मांस आणि मद्य विक्रीवर बंदी घालणारा कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! |