ब्राह्मणांना संपवण्याची भाषा करणार्या व्यक्तीला अटक करा !
जळगाव बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने निवेदन !
जळगाव – मराठा नेते जरांगे पाटील यांचे अनुयायी असलेल्या आणि योगेश सावंत या व्यक्तीने ‘ब्राह्मणांना काही मिनिटांत संपवू’, असे प्रक्षोभक व्यक्तव्य केले होते. याविरोधात येथील बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने ‘ब्राह्मणांना संपवण्याची भाषा करणार्या व्यक्तीला अटक करा !’ असे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षकांनाही हे निवेदन देण्यात आले. या वेळी ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. त्यांनी घोषणा देऊन आंदोलन करत हे निवेदन दिले.
विडियो स्त्रोत : Times Now Marathi
प्रसारमाध्यमांना यात काहीच आक्षेपार्ह वाटत नाही ! – ब्राह्मण समाजातील महिलेची प्रतिक्रिया
‘माध्यमांनी कुठेच ब्राह्मणांना संपवण्याची भाषा करणे, हे आक्षेपार्ह आहे’, असे म्हटले नाही, याचे आश्चर्य वाटते ? उद्या आमच्यावर आक्रमण झाले, तर त्याला प्रसारमाध्यमेही उत्तरदायी असतील. आम्हालाही आता लाठ्या-काठ्या, शस्त्र घेण्याची अनुमती द्या. आतापर्यंत ब्राह्मणांनीच अनेक लढाया जिंकल्या आहेत.