महामार्गावरील मजार न हटवल्यास शेजारी हनुमानाचे मंदिर उभारू ! – नितेश राणे, आमदार, भाजप
|
चांदवड (जिल्हा नाशिक) – येथील राष्ट्रीय महामार्गावर सोग्रस फाट्यावर मधोमध एक मजार उभारण्यात आली आहे. गंभीर गोष्ट म्हणजे या मजारीचा खर्च, तसेच ही मजार बांधल्यावर तिच्या कार्यक्रमासाठी मालेगावहून आलेल्या मौलवीला तब्बल २० सहस्र रुपये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया) च्या खात्यामधून दिल्याचे उघड झाले आहे. ही मजार तात्काळ हटवली न गेल्यास तिथे शेजारी हनुमानाचे मंदिर उभारू, अशी चेतावणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
धर्मांध अधिकार्याने संधी साधून प्राधिकरणातून मजारीसाठी पैसे घेतले !
चांदवड येथील पथकरनाक्यावर काम करणार्या हश्मी या धर्मांध अधिकार्याचे या भागात वर्चस्व असल्याचे समोर आले आहे. त्याने संधी साधून ही मजार उभी केली असल्याने त्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी होत आहे. त्याला साहाय्य करणार्यांची नावेही पुढे आली पाहिजेत.
संपादकीय भूमिका
|