यवतमाळ येथे अवघ्या १० मिनिटांत मराठी भाषेची प्रश्नपत्रिका फुटली !
इयत्ता १० वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशीचा प्रकार
यवतमाळ : येथे इयत्ता १० वीची परीक्षा चालू झाल्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ मार्चला अवघ्या १० मिनिटांत मराठी भाषेची प्रश्नपत्रिका फुटली. ती सामाजिक संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. या प्रकरणी गटशिक्षण अधिकार्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. भरारी पथक पुढील चौकशी करत आहे.
(सौजन्य : Zee 24 Taas)
संपादकीय भूमिकाशिक्षणाचे तीन-तेरा ! वारंवार होणार्या पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे ! यावर सरकार कसे नियंत्रण आणणार ? |