CSE Report On Environment : देशात पर्यावरणविषयक १ लाख २५ सहस्रांहून अधिक तक्रारींची नोंद – ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट’
अलवर (राजस्थान) – ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट’ या संस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायर्न्मेंट’ (भारताच्या निसर्गाची स्थिती) अहवालानुसार देशात पर्यावरणविषयक १ लाख २५ सहस्रांहून अधिक तक्रारींची नोंद झाली आहे. यातील ८८ सहस्र ४३९ तक्रारी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वाधिक तक्रारी तमिळनाडूत नोंदवण्यात आल्या असून महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे.
पर्यावरणीय तक्रारींमध्ये प्रतिवर्षी वाढ होत असल्याने न्यायालयीन प्रक्रियेवरही ताण येत आहे. एकूणच प्रलंबित याचिकांची संख्या वाढत आहे. प्रशासनाने वर्षभरात या सगळ्या तक्रारी निकालात काढायच्या ठरवल्या, तर प्रतिदिन २४२ याचिकांची सुनावणी करावी लागेल, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकादेशातील पर्यावरणाचा विनाश होत असतांना त्याविषयी भारतीय जागृत नाहीत आणि कोणतेही सरकार अन् राजकीय पक्ष याविषयी जनतेला युद्धपातळीवर जागृत करत नाही, हे लज्जास्पद ! |