विविध देशांच्या संदर्भात चीनची विदारक परिस्थिती !
चीनमधील सर्वांत मोठे ‘चायना एव्हरग्रँड ग्रुप’ आस्थापन बंद झाल्यावर विदेशी गुंतवणूकदारांना पैसे मिळणार नाहीत. ज्यांनी या आस्थापनाचे ‘बाँड’ घेतले आहेत, त्यांना चीनच्या या आस्थापनाच्या व्यावसायिकाला न्यायालयात उभे केल्यानंतरच मानसिक समाधान मिळेल. काही निरीक्षकांच्या मते ‘चायना एव्हरग्रँड ग्रुप’ची मालमत्ता बंद झाल्यावर ‘बिजिंग’ विदेशी गुंतवणूकदारांना मान देते कि नाही ? याची परीक्षा होईल.
१. रशियाचा वाढता सहभाग आणि चीनचे दूर रहाण्याचे धोरण
रशियन आस्थापनांना चीनमधील बँकांशी व्यवहार करण्यात येणार्या अडचणी ‘क्रेमलिन’ या वित्तीय संस्थेच्या लक्षात आल्या आहेत. रशियन आस्थापनांना चीनमधील बँकांशी (अधिकोश) व्यवहार करण्यात अडचणी येत आहेत. चीनमधील वित्त संस्थांकडून रशियन आस्थापनांशी आर्थिक व्यवहारांविषयी वाटाघाटी करतांना दोन देशांमधील आर्थिक व्यवहारासंबंधीच्या स्थिरतेविषयी प्रश्न विचारून ही आस्थापने देयक असलेली रक्कम अडवून ठेवत आहे.
मॉस्कोसाठी आर्थिक व्यवहाराविषयी चीन हा प्रमुख भागीदार असून विशेषतः युक्रेनमधील युद्धानंतर पश्चिमेकडील राष्ट्रांनी घातलेल्या निर्बंधामुळे आर्थिक व्यवहार टिकवून ठेवण्यास रशियाला साहाय्य होत आहे. गेली काही वर्षे रशिया आणि चीन यांच्या आस्थापनांमधील व्यवहार पुष्कळ वाढला आहे. प्रामुख्याने ऊर्जा आणि गॅस यांच्या निर्यातीमुळे दोन्ही देशांमधील आर्थिक व्यवहारात वाढ झाली आहे. या उभय देशांतील व्यापारावर आणि आर्थिक सहकार्यावर प्रमुख परिणाम होईल, हे लक्षात घेऊन रशियन सरकार कृतीशीलपणे चीनशी संबंध ठेवून आहे.
या गंभीर परिस्थितीवर प्रकाश टाकणार्या ‘वेडोमोस्ती’ वित्त संस्थेच्या अहवालानुसार ‘झेजियां चाऊझाऊ कमर्शियल बँक’ने रशियन आस्थापनांना त्यांच्या चीनमधील भागीदारासह आर्थिक व्यवहार करण्यात वाढत जाणार्या आव्हानांचा विचार करून रशियासमवेतचे सर्व आर्थिक व्यवहार निलंबित केले आहेत.
२. मालदीवचे भारतियांच्या प्रभावापासून दूर राहून चीनशी संबंध ठेवण्याविषयीचे संकेत
मालदीवचे नवीन राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांनी त्यांच्या देशाच्या सीमेवरील भागाची सुरक्षा आणि आधुनिक काळाच्या दृष्टीने क्षमता निर्माण करणे यांसाठी देशातील लष्कर अजून बळकट करण्याचे आवाहन केले आहे. यासह त्यांनी मालदीव द्वीपसमूहामधून भारतीय लष्कर काढून घेऊन भारतियांच्या प्रभावापासून दूर जाऊन चीनशी संबंध ठेवण्याविषयीचे संकेत दिले आहेत. मालदीवच्या विशेष आर्थिक विभागावरील पहारा वाढवून भारतीय नौका त्यांच्या क्षेत्रात प्रवेश करत असल्याचा आरोप मुइज्जू यांनी केला आहे. मालदीवने भारतासह केलेला वर्ष २०१९ चा करार रहित केल्यानंतर तिथे जाणार्या भारतातील प्रसिद्ध व्यक्तींनी बहिष्कार घातला. त्यामुळे झालेल्या आर्थिक परिणामामुळे तेथील तणाव वाढला आहे.
३. मालदीवमध्ये ‘झिआंग यांग हाँग’ या चीनच्या संशोधन नौकेचे आगमन अपेक्षित
मालदीवमध्ये चीनच्या ‘झिआंग यांग हाँग’ या नौकेचे आगमन होण्याची शक्यता असल्याने बिजिंग, देहली आणि मालदीव यांच्यामधील तणाव वाढला आहे. झिआंग यांग हाँग हे अधिकृतपणे कर्मचार्यांची भरती करणे किंवा त्यांच्या कामामध्ये पालट करणे, यासाठी मालदीव बंदरात थांबणार आहे. थोडक्यात यामुळे काही मोठा उपद्रव होणार आहे, असे नाही; परंतु चीनकडून माहिती गोळा करण्यासाठी चालू करण्यात आलेली मोहीम असून पुढे ही माहिती चीनच्या सैन्याला पाणबुड्यांचा वापर करतांना उपयोगी ठरू शकते, असा विचार भारताकडून होऊ शकतो.
४. चिनी ड्रॅगनची शक्ती न्यून होणे
पुष्कळ प्रमाणात घेतलेली कर्जे आणि चीनच्या स्वप्नांचा भंग होत असल्याने ‘एक शक्तीशाली केंद्र’ म्हणून चीनची उत्कर्षाची वर्षे संपत आल्यासारखी वाटत आहे. फेब्रुवारी मासाच्या शेवटच्या आठवड्याच्या वेळी चीनमधील सर्वांत मोठी अशी वार्षिक सुटी ‘ल्युनर न्यू इअर’च्या निमित्ताने असणार आहे. अनेक विदेशातील कामगार या वेळी त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी घरी परत येतात. वर्ष २०२४ हे ‘इअर ऑफ ड्रगन’ असून पारंपरिक दृष्टीनेही वेळ पैसे कमवणे आणि मुले जन्माला घालणे यांसाठी पवित्र आहे. असे असले, तरी चीनमधील भरभराटीची वर्षे संपली असून त्याची जागा आता पुष्कळ प्रमाणात कर्ज घेणे, प्रशासनाची वाईट अवस्था, समाजाची वाईट स्थिती आणि भंगलेली स्वप्ने यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रगतीचे झेंडे आणि लोकसंख्या ही संकल्पना आता जुनी होत आहे. यामुळे चीनच्या बाहेरून चीनमध्ये येणार्याला ‘आम्ही समृद्ध चीनमध्ये आहोत का ?’, असा गंभीर प्रश्न पडू शकतो.
५. चीनमधील लोकांचे अन्य देशांतील लोकांवर प्रभुत्व
चीनची नियंत्रण करण्याची क्षमता तंत्रज्ञानामुळे पुष्कळच वाढली आहे; परंतु त्याच्या हेरगिरीचे कौशल्य जुन्या पद्धतीच्या साधनांवर अवलंबून आहे. गेल्या दशकामध्ये आधुनिक नियंत्रण करण्याच्या यंत्रणेमुळे चीनमधील साम्यवादी पक्षाला इतर क्षेत्रांपेक्षा नागरिकांवर लक्ष ठेवण्याची क्षमता अधिक प्रमाणात लाभली आहे. चीन त्याची उत्पादने विकसित देशांना देत असल्याने पाश्चिमात्य राष्ट्रांना चीन तंत्रज्ञानावर आधारित जगभर पसरेल, अशी भीती वाटत आहे. चीनमधील हेरगिरी भक्कम असतांना त्याच्या पद्धतीने जगावर अधिपत्य मिळवण्याविषयीचा दृष्टीकोन अधिक प्रमाणात निर्माण झाला आहे. चीनमधील नियंत्रण ठेवण्याची क्षमता ही तंत्रज्ञानामुळे नसून ती तेथील साम्यवादी पक्षाच्या विरोधात कोणताही पक्ष, संस्था आणि सुसंस्कृतपणा नसल्याने आहे. ही वेगळी यंत्रणा कॅमेरा, सेन्सर किंवा ‘सॉफ्टवेअर’ यांप्रमाणे निर्यात केली जाऊ शकत नाही.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.