अमेरिकेत शीख संगीतकाराच्या हत्येला ५ दिवस उलटूनही शवविच्छेदन नाही !
|
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या अलाबामा राज्यात राज सिंह (गोल्डी) नावाच्या एका शीख संगीतकाराची हत्या करण्यात आली. राज्यातील सेल्मा शहरात एका गुरुद्वाराबाहेर काही आक्रमणकर्त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. सिंह मूळचे उत्तरप्रदेशातील बिजनौरचे रहिवासी होते. ते दीड वर्षापूर्वी अमेरिकेत आले होते. अमेरिकी प्रसारमाध्यमांनुसार गोळीबाराची घटना २४ फेब्रुवारी या दिवशी घडली.
सिंह यांच्या उत्तरप्रदेशातील कुटुंबियांना या घटनेची माहिती २५ फेब्रुवारी या दिवशी देण्यात आली. त्यांच्या कुटुंबियातील सदस्य गुरदीप सिंह यांनी आरोप केला की, हत्येला ५ दिवस उलटूनही शवविच्छेदन झालेले नाही. विलंबाचे कारण सांगण्यात आलेले नाही. त्यासह आक्रमणकर्त्यांची माहिती आणि हत्येचा हेतू कळू शकलेला नाही. द्वेषातून झालेल्या हत्येचे हे प्रकरण असू शकते, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. उत्तरप्रदेशात मृतदेह आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी भारत सरकारकडे साहाय्य मागितले आहे.
संपादकीय भूमिका
|