राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करणार्या पोलिसांवर कारवाई करा ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
कोल्हापूर – वाल्मीकिनगर येथे १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी हिंदु युवक शिवजयंती साजरी करतांना एक मुसलमान युवक अत्यंत वेगाने वाहन चालवत होता. त्याला हिंदू युवकांनी वेगात गाडी चालवल्याविषयी हटकले असता त्याने आणखी धर्मांधांना आणून हिंदू युवकांना मारहाण केली. ही गोष्ट हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना समजल्यावर ते वाल्मिकी वसाहत येथे थांबले होते; पण ते शांतपणे उभे असतांनाही पोलिसांनी त्यांना अमानुष मारहाण केली. यानंतर पोलिसांनी त्या तरुणांना राजवाडा पोलीस ठाण्यात आणून काठ्यांनी मारहाण करून त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंद केले. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करणारे राजवाडा पोलीस ठाण्यातील सर्व उत्तरदायी अधिकारी, पोलीस यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा सकल हिंदु समाज आंदोलन करेल, असे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना देण्यात आले.
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहरप्रमुख श्री. गजनान तोडकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, बजरंग दलाचे श्री. निखिल उलपे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. साईराम जगताप, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते
संपादकीय भूमिका‘कारवाई करा’, असे पोलिसांना सांगावे का लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाही ? |