सागरी मार्ग (कोस्टल रोड) येत्या ८ दिवसांत चालू करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
मुंबई – सागरी मार्गाचा (कोस्टल रोड) बिंदूमाधव चौक ते मरीन ड्राइव्हपर्यंतचा भाग येत्या ८ दिवसांत चालू करणार, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २९ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत दिली. विरोधकांनी या वेळी उद्योग विभागावर केलेले आरोप सामंत यांनी आकडेवारी मांडत फेटाळून लावले. उद्योग विभागाकडून जे सामंजस्य करार (एम्.ओ.यु.) करण्यात आले, त्यातील ८० टक्के पूर्ण झाले आहेत. महायुती सरकारच्या काळात गेल्या १६ मासांत महाराष्ट्र गुंतवणुकीच्या संदर्भात आणि उद्योग जगतात क्रमांक एकवर राहिला आहे अन् यापुढेही कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.