चिक्कपेटे (कर्नाटक) येथे भर रस्त्यात नमाजपठण, गुन्हा नोंद !
बेंगळुरू – राज्यसभा निवडणुकीतील विजय साजरा करतांना काँग्रेस उमेदवार नासिर हुसेन यांच्या पाठीराख्यांनी पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्याचा आरोप होत असतांनाच आता भर रस्त्यात मुसलमानांनी नमाजपठण केल्याचे वृत्त समोर आले आहे. चिक्कपेटे विधानसभा क्षेत्रातील सिद्धापूरमध्ये अतिक मशिदीजवळ रस्त्यातच मुसलमान नमाजपठण करत असल्याची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता तेजस गौडा यांनी याविषयी तक्रार प्रविष्ट केल्यानंतर सिद्धापूर ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
अतिक मशिदीजवळ मुसलमानांनी भर रस्त्यात बसून नमाजपठण केल्याने जनसामान्यांना त्रास झाला. दळणवळणाची कोंडी झाली. सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करणे हे बेकायदेशीर आहे. मुसलमानांचे हे कृत्य अन्य धर्मियांच्या भावनांचा अनादर करण्यासारखे आहे. या अवैध कृतीला उत्तरदायी असलेल्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी तेजस गौडा यांनी तक्रारीत केली आहे.