बेंगळुरू शहरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ ! – सरकारने दिली माहिती
बेंगळुरू (कर्नाटक) – वर्ष २०२१ ते वर्ष २०२३ या काळात राजधानी बेंगळुरूमध्ये महिलांवरील अत्याचारांची ४४४ प्रकरणे पोलिसांत नोंदवण्यात आली होती. ही संख्या प्रतिदिन वाढत आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी विधान परिषदेत दिली. ‘महिलांविरुद्धचे अपराध नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार सावधगिरीने पावले टाकत आहे’, असे ते म्हणाले.
संपादकीय भूमिकाकाँग्रेस सरकारने केवळ माहिती देऊ नये, तर अत्याचार रोखण्यासाठी काय कारवाई केली जात आहे, हेही सांगायला हवे ! |