Karnataka Govt Land Jihad : बेंगळुरूतील पशूपालन विभागाची ५०० कोटी रुपयांची २ एकर भूमी अल्पसंख्यांक कल्याण विभागाला दिली !
|
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ५०० कोटी रुपयांहून अधिक किमतीची २ एकर भूमी अल्पसंख्यांक कल्याण विभागाला दिली. यावरून भाजपने काँग्रेसवर ‘लँड जिहाद’ केल्याचा आरोप केला. या जागेवर सध्या पशूवैद्यकीय रुग्णालय आहे.
Karnataka Congress Government's repetitive attempt to appease Mu$l!ms
The Animal Husbandry Department in Bengaluru has transferred 2 acres of land, worth Rs 500 crore, to the Minority Welfare Department.
BJP accuses Karnataka Government of 'Land J!h@d'
Congress is akin to… pic.twitter.com/K97SfhsJ8j
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 1, 2024
विरोधी पक्षनेते आर्. अशोक म्हणाले की, रिकामी जागा देण्यात आली असती, तर एकवेळ आम्ही ते मान्य केले असते; मात्र येथे पशूपालन विभागाची जागा देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मुसलमानांच्या लांगूलचालनाला मर्यादा नसावी का ? बेंगळुरूच्या मध्यभागी असलेल्या पशुसंवर्धन विभागाची २ एकर भूमी मुसलमानांना देण्याचा तुमचा डाव आहे. सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालय जे गायी आणि इतर प्राणी यांवर उपचार करतात, ते रुग्णालय बंद करून ती भूमी मुसलमानांना देण्याची काय आवश्यकता होती ? पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थापना केवळ गुरांवर उपचार करण्यासाठी झाली नाही, तर इतर पाळीव प्राण्यांवरही तेथे उपचार केले जात होते. आम्ही ५०० कोटी रुपयांची भूमी हस्तांतरित होऊ देणार नाही. काँग्रेसच्या या निर्णयाला ‘लँड जिहाद’ म्हणता येईल का ?
संपादकीय भूमिकाकाँग्रेस म्हणजे दुसरी मोगली राजवट ! मोगल बादशाहांना मागे टाकणार्या काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपवल्याविना हिंदूंना चांगले दिवस येणार नाहीत, हे लक्षात घ्या ! |