NBDSA Action : श्रद्धा वालकर प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ म्हटल्यावरून ‘न्यूज १८ इंडिया’ आणि ‘टाइम्स नाऊ’ या हिंदी वृत्तवाहिन्यांवर कारवाई !
अनुक्रमे ५० सहस्र आणि १ लाख रुपयांचा दंड
नवी देहली – ‘न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड्स अथॉरिटी’ने (‘एन्.बी.डी.एस्.ए.’ने) ‘न्यूज १८ इंडिया’ आणि ‘टाइम्स नाऊ नवभारत’ या हिंदी वृत्तवाहिन्यांवर श्रद्धा वालकर प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ म्हणत द्वेष निर्माण केल्याच्या नावाखाली कारवाई केली आहे. या वाहिन्यांना अनुक्रम ५० सहस्र आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला, तसेच या संदर्भातील व्हिडिओ सर्व ठिकाणांवरून ७ दिवसांत हटवण्याचा आदेश दिला. श्रद्धा वालकर ‘लव्ह इन रिलेशनशिप’मध्ये आफताब या मुसलमान तरुणासमवेत रहात होती. आफताब याने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून ते येथील जंगलात फेकले होते.
Hindi news channels 'News 18 India' and 'Times Now' scrutinized for calling Shraddha Walker's murder, a case of 'Love J!h@d'.
— The news regulatory body NBDSA, imposed a fine of Rs.50 thousand and Rs.1 lakh respectively.
👉 Ironically, in the world's largest democracy, it is… pic.twitter.com/lJ0KNIXgGY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 1, 2024
‘न्यूज १८ इंडिया’ने तिच्या ३ कार्यक्रमांमध्ये या प्रकरणाचा ‘लव्ह जिहाद’ असा उल्लेख केला होता. यामध्ये २ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमन चोप्रा यांनी केले होते, तर एक कार्यक्रम अमिश देवगण यांनी सादर केला होता. ‘टाइम्स नाऊ नवभारत’वरील कार्यक्रम हिमांशु दीक्षित यांनी सादर केला होता. या कार्यक्रमांच्या माध्यमातून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे.
'Every Inter-Faith Relationship Not Love Jihad' : NBDSA Penalises News18 India, Aaj Tak & Times Now Navbharat For Communal Programshttps://t.co/Gq2ZXKoiEk
— Live Law (@LiveLawIndia) February 29, 2024
‘एन्.बी.डी.एस्.ए.’चे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए.के. सीकरी म्हणाले की, प्रत्येक आंतरधर्मीय विवाहास ‘लव्ह जिहाद’ म्हणणे चुकीचे आहे.
‘आज तक’वरील श्रीरानवमीच्या दिवशी मिरवणुकांवर झालेल्या आक्रमणाच्या कार्यक्रमावरही आक्षेपवर्ष २०२३ मध्ये श्रीरामजनवमीच्या दिवशी देशात विविध ठिकाणी हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण करण्यात आले होते. या संदर्भात आज तक या हिंदी वृत्तवाहिनीवर ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या कार्यक्रमात निवेदक सुधीर चौधरी यांनी विश्लेषणात्मक कार्यक्रम सादर केला होता. यावरही ‘एन्.बी.डी.एस्.ए. आलेल्या तक्रारीवरून या कार्यक्रमाचा व्हिडिओ सर्व माध्यमांतून हटवण्याचा आदेश दिला. या विषयी ‘एन्.बी.डी.एस्.ए.ने म्हटले की, कार्यक्रमामध्ये काही अयोग्य घटना धार्मिक हिंसाचाराशी जोडून एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यात आले आहे. भविष्यात सावध रहाण्याची आवश्यकता आहे. इंद्रजीत घोरपडे यांच्या तक्रारीच्या आधारे आज तकला नोटीस बजावण्यात आली. (हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर धर्मांध मुसलमान आक्रमण करतात, हे उघड असतांना ते दाखवणेही गुन्हा ठरवणारे असे मंडळच विसर्जित केले पाहिजे ! – संपादक) |
संपादकीय भूमिका
|