JNU Clash : ‘जे.एन्.यू.’मध्ये साम्यवादी आणि ‘अभाविप’ संघटनांच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी !

नवी देहली – येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठामध्ये (जे.एन्.यू.मध्ये) साम्यवादी विद्यार्थी संघटना आणि ‘अभाविप’ यांच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. ‘अभाविप’च्या विद्यार्थ्यंनी आमच्यावर आक्रमण केले आणि लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली’, असा आरोप साम्यवादी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्याच वेळी ‘अभाविप’ने साम्यवादी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी अभाविपच्या विद्यार्थ्यांवर आक्रमण केले, असा आरोप केला आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाले आहेत.

विद्यापीठ निवडणूक समितीच्या सदस्यांच्या निवडीच्या मुद्यावरून गोंधळ !

‘जेएनयू’च्या कॅम्पसमध्ये निवडणूक समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी सर्वसाधारण सभेची बैठक चालू होती. अचानक तेथे वाद झाला. यानंतर साम्यवादी संघटना आणि ‘अभाविप’ यांच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना मारहाण करणे चालू केले. या प्रकरणी कुलगुरूंनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

जे.एन्.यू.वर जोपर्यंत साम्यवाद्यांचे वर्चस्व आहे, तोपर्यंत असे प्रकार चालूच रहातील. हे रोखण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेणे आवश्यक !