अहिल्यानगर येथे २०० जणांना विषबाधा !
अहिल्यानगर – जिल्ह्यातील अकोले तालुक्यात २८ फेब्रुवारीला झालेल्या हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून २०० जणांना विषबाधा झाली. त्यांना जुलाब आणि उलट्या यांचा त्रास होऊ लागल्याने अनेकांना रुग्णालयात नेण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये ७ बालकांचाही समावेश आहे.