‘महादेव बेटिंग ॲप’ प्रकरणी ईडीच्या धाडी !

मुंबई – ‘महादेव बेटिंग ॲप’ प्रकरणी अंमलबाजवणी संचालनालयाने (ईडीने) देशभरात १७ ठिकाणी धाडी घातल्या. बंगाल, देहली, छत्तीसगड, तसेच मुंबईत ३ ठिकाणी ईडीने ही धाड घातली. हवाला आणि एफ्.डी.आय. गुंतवणूक प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. महादेव ॲपच्या माध्यमातून ‘ऑनलाईन कॅसिनो’ आणि सट्टेबाजीसह अनेक अनधिकृत गोष्टी चालवल्या जातात. ‘महादेव ॲप’च्या माध्यमातून आलेला पैसा शेअर बाजारात गुंतवून, तसेच अल्प कर नसणार्‍या (टॅक्स सेव्हर) देशात हे पैसे वळवून त्याला अधिकृत (व्हाईट मनी) केले जात असल्याचे लक्षात आले आहे.

टायगर श्रॉफ, सनी लियोनी, गायक विशाल ददलानी आणि नेहा कक्कर आदी बॉलीवूडमधील अभिनेते आणि गायक ‘महादेव बुक ॲप’चे प्रमोटर चंद्रकार यांच्या लग्न सोहळ्याला दुबईमध्ये उपस्थित होते. महादेव ॲपचे प्रमोशन केल्यासंदर्भात गेल्या वर्षी अभिनेता रणबीर कपूरला ईडीने समन्स बजावून रायपूर ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते.

‘लायन बुक ॲप’ यशस्वी झाल्याच्या मेजवानीत मागील वर्षी संजय दत्त, सुनील शेट्टी आणि अन्य अनेक कलाकार उपस्थित होते. यासाठी त्यांना मानधन म्हणून हवालाच्या माध्यमातून मोठी रक्कम देण्यात आल्याचे ईडीच्या अन्वेषणात लक्षात आले.

आता ‘खिलाडी ॲप’ला तपासयंत्रणांनी लक्ष्य केले आहे.

संपादकीय भूमिका 

तरुणांचे आदर्श असणारे कलाकार जुगाराला प्रोत्साहन देणे, देशाचा पैसा बुडवणे आदी किती देशद्रोही गोष्टी करत आहेत, हे लक्षात घ्या !