सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यानंतर हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील साधक श्री. राजू धरियण्णवर यांना आलेल्या अनुभूती

११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मदिन ‘ब्रह्मोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. फर्मागुडी, गोवा येथे साजरा करण्यात आलेल्या या सोहळ्याला विविध राज्यांतून साधक आले होते. हुब्बळ्ळी, कर्नाटक येथील साधक श्री. राजू धरियण्णवर यांना महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी, तसेच नंतरही आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या दुसर्‍या दिवशीचा सूर्यप्रकाश नवीन आणि आल्हाददायक असल्याचे, तसेच ब्रह्मोत्सवापासून सत्ययुगाचा आरंभ झाला असल्याचे जाणवणे : ‘परात्पर गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी मी बाहेरचे वातावरण बघत असतांना मला त्या दिवशीचा सूर्यप्रकाश वेगळाच वाटला. ‘तो पूर्वीच्या तुलनेत नवीन आणि आल्हाददायक आहे’, असे मला जाणवले.

श्री. राजू धरियण्णवर

२. ‘ब्रह्मोत्सवापासून सत्ययुगाचा आरंभ झाला आहे’, असे मला वाटले.

३. माझ्या मनावर कुटुंबाच्या दायित्वाचा ताण होता; मात्र आता मला केवळ गुरुदेवांची सेवा (अध्यात्मप्रसाराची सेवा) करायची असून ‘परात्पर गुरुदेवच माझ्या कुटुंबियांची काळजी घेणार आहेत’, याची मला निश्चिती वाटत आहे.

४. एखाद्या प्रसंगात मला काही सुचत नसेल, तर ‘गुरुदेव माझ्या शेजारी असून मला मार्गदर्शन करत आहेत’, असे मला जाणवते.

५. आता मला माझ्याकडून होणार्‍या अधिकाधिक चुका लक्षात येत असून त्या मी स्वभावदोष निर्मूलनाच्या सारणीत प्रतिदिन लिहित आहे.

६. माझ्याकडून प्रार्थनाही गुणवत्तापूर्वक (भावपूर्ण) होत आहेत.

७. आता माझ्या मनात मायेतील विषयांपेक्षा गुरुदेवांचाच विचार अधिक असतो.

ब्रह्मोत्सव सोहळ्याचे नियोजन चांगल्या प्रकारे करणार्‍या साधकांप्रती आणि गुरुदेवांच्या चरणकमली मी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करत आहे.’

– श्री. राजू धरियण्णवर, हुब्बळ्ळी, कर्नाटक. (३१.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक