‘योगक्षेम’चा अर्थ
धीर विचारी मनुष्य विवेकाने कोणत्याही गोष्टीची पारख करतो आणि त्यातून धीर मनुष्य ठामपणे श्रेयसची (योग्य) निवड करतो, तर मंदबुद्धी मनुष्य योगक्षेमासाठी प्रेयसची निवड करतो. योगक्षेमचा अर्थ स्वतःकडे नसलेले प्राप्त करणे (योग) आणि स्वतःकडे आधीचे आहे ते सांभाळणे (क्षेम) ! प्रारंभीला जे लोभस, आनंददायी, सोपे म्हणून आपण निवडतो; ते शेवटी दुःखद, त्रासदायक आणि हानी करणारे ठरते. याउलट ज्याला आपण नावडते, अवघड, तापदायक म्हणून नाकारतो, तेच अंतिमतः आपणास आनंददायी, लाभदायी, सुखदायी आणि हितकारक ठरते.
(साभार : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०२३)