सद्गुरु श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने ३ मार्चला पलूस-आंधळी (जिल्हा सांगली) पायी दिंडी सोहळा !
पलूस (जिल्हा सांगली) – प्रतिवर्षी गजानन महाराज प्रकट दिन आणि पुण्यतिथी सोहळा सद्गुरु धोंडीराज महाराज समाधी मंदिर येथे साजरा करण्यात येतो. गेल्या वर्षी आंधळी येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे नवनिर्माण होऊन प्राणप्रतिष्ठा झाल्याने तेथे अखंड पूजा, उपासना चालू आहे. त्यामुळे यंदा हा नामसाधना पायीदिंडी सोहळा ३ मार्चला पलूस ते आळंदी फाटा (३ किलोमीटर) असा आयोजित करण्यात आला आहे. तरी भाविकांनी पायीदिंडी सोहळा आणि श्री गजानन महाराज प्रकट दिन यांसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री धोंडीराज महाराज समाधी मंदिराचे सेवाधारी व्यवस्थापक यांच्या वतीने करण्यात आले आहे.