उपाय सत्संगातून भाववृद्धी करायला शिकवणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद (अण्णा) गौडा (वय ४७ वर्षे) !
‘प्रतिदिन सकाळी ५.३० ते ६.३० वाजेपर्यंत धर्मसभेनिमित्त ‘महाशून्या’चा जप आणि ६.३० ते ७ वाजेपर्यंत उपाय सत्संग (उपाय सत्संग म्हणजे व्यष्टी साधनेसाठी सांगण्यात येणारे विषय) असायचा. सेवेच्या आधी सर्व साधकांकडून ‘व्यष्टी साधना झाली पाहिजे’, अशी तळमळ आमच्यापेक्षा पू. रमानंद (अण्णा) गौडा यांच्यामध्येच अधिक असते.
व्यष्टी साधनेत दृष्ट काढणे, स्तोत्र म्हणणे, प्रार्थना करणे, चैतन्य प्राप्त करणे, हे सर्व केल्यास साधकांची समष्टी साधनाही संपूर्ण दिवस उत्तम होते, हा त्यांचा त्यामागील उद्देश आहे. त्यासह शेवटी क्षमायाचनाही करायची असते. तीसुद्धा पू. रमानंदअण्णाच आमच्याकडून करून घेतात. तेव्हा त्यांच्यात असलेला अत्यंत शरणागतभाव त्यांच्या वाणीतून व्यक्त होऊन आम्हा सर्वांमध्ये तोच भाव प्रकट होतो, उदा. तुमच्या कृपेच्या जाणिवेने आमच्या मनातील अंधःकार नष्ट केला. तेव्हा ‘खरोखरच गुरुदेवांनी आमच्यावर केलेल्या अपरंपार कृपेचे स्मरण होऊन गुरु किती वेळा आमच्या चुका क्षमा करून आम्हाला साहाय्य करत आहेत’, हे लक्षात येऊन मन आणि देह सर्व अपराधी होऊन त्यांच्या चरणी शरण जाऊन क्षमायाचना करते, तसेच संपूर्ण दिवस त्याच भावात राहून सेवा आणि साधना करणे साध्य होते.
अशा संतांना आमच्या साधनेसाठी जोडणार्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), मंगळुरू. (६.३.२०२३)