अण्वस्त्रसज्ज पाकिस्तान हा संपूर्ण मानवतेसाठी धोकादायक !
सध्या जग आण्विक आपत्तीच्या उंबरठ्यावर उभे आहे. सध्या पारंपरिक शस्त्रांच्या ऐवजी ‘न्यूक्लिअर वॉरहेड’ (अण्वस्त्रे सोडण्याची यंत्रणा) वापरले जाते. हिरोशिमा आणि नागासाकी यांच्यावर बाँब टाकून आक्रमण करणार्या विमानांमध्ये काही पालट करून अणुबाँब टाकण्यात आले. जपानला स्वतःवर अणूबाँबचे आक्रमण होईल, अशी अपेक्षा नव्हती. अशी आपत्तीजनक परिस्थिती येण्याचा धोका आजही नाकारता येत नाही.
१. अणूशक्तीसंदर्भात पाकिस्तानविषयीचे सत्य !
पाकिस्तानने अणूशक्तीविषयी अण्वस्त्रे बाळगणे, इस्लामी बाँब सिद्ध करण्याविषयी विचार करणे यासंबंधी बराच पल्ला गाठला असून शेजारच्या इस्लामी राष्ट्रांवर त्याचा वरदहस्त आहे. अण्वस्त्रे सिद्ध करणारी अमेरिका ते भारत (पाकिस्तान वगळता) यांनी स्पष्टपणे ‘फर्स्ट यूज’ (प्रथम अण्वस्त्रांचा वापर करणे) हा पर्याय काढून टाकला आहे. ‘आम्ही अण्वस्त्रे वापरण्याच्या विरोधात आहोत’, हे भारत कित्येक दशके सांगत आहे; परंतु ‘आता भारतावर अण्वस्त्रे वापरून आक्रमण झाले, तर तो कोणत्या प्रकारची शक्ती आहे, हे न पहाता त्याला जशास तसे उत्तर देईल’, असे सांगणे त्याला (भारताला) भाग पडत आहे. भारताने हे आता जाहीरपणे सांगायला पाहिजे; कारण पाकिस्तानी जनरल आणि देशवासीय नियमितपणे भारताविरुद्ध सतत अण्वस्त्रे वापरण्याची भाषा करत असून रणनीतीच्या दृष्टीने ते अण्वस्त्रे सिद्ध करत आहेत. संदिग्धता बाळगल्याने अण्वस्त्रे वापरण्यास चालना देणार्या राष्ट्रांना थांबवू शकत नाही; परंतु आंतरराष्ट्रीय दबावामुळे त्यांच्यावर इतर राष्ट्रांच्या विरोधात कृती करण्यावर बंधने येतात.
असे असले, तरी ती राष्ट्रे विदेशातील चालना दिल्या गेलेल्या व्यक्तींना शांतता आणि युद्ध यांच्यामधील भागांमध्ये कार्य करण्यास पाठिंबा देतात. या राष्ट्रातील आणि परराष्ट्रातील हस्तक हे आंतरराष्ट्रीय कायदे अन् नियम यांचा भंग न करता सतत अल्प दर्जाच्या निमलष्करी कारवाया करत असतात. कदाचित् त्यामध्ये अजून वाढ होऊ शकते; परंतु ते पारंपरिक मर्यादेच्या आत असते. हे कोणतीही चेतावणी न देता केले जाते. मुंबईवर पाकने केलेले आक्रमण, पुलवामा आणि पठाणकोट येथील आक्रमण ही त्याची उदाहरणे आहेत.
याच्यापेक्षा अधिक आक्रमणे जी थेट आणि भीती दाखवणारी होती, ती म्हणजे वर्ष १९६५ अन् वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली आक्रमणे. भारताने लगेच प्रत्यत्तुर देऊन मोठ्या प्रमाणात आणि कल्पना न करण्याएवढी हानी करण्याचा स्वतःचा निर्धार आधी दाखवला असता, तर संसदेवरील आक्रमण आणि कारगिल युद्ध झाले नसते. पाकिस्तानकडे सध्या १७० हून अधिक अण्वस्त्रे आहेत, तसेच पाकिस्तान रणनीतीच्या दृष्टीने आण्विक शस्त्रे निर्माण करत आहे.
२. पाक आतंकवाद्यांना अण्वस्त्रे वापरण्यास देण्याची शक्यता अधिक !
सहज अभ्यास केला असता असे लक्षात येते की, भारताविरुद्ध पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि हुकूमशाह यांनी अनावश्यकपणे युद्ध केली आहेत. वर्ष १९४७-४८ मध्ये काश्मीरमध्ये अकबर खान याने, जनरल अयुब खान यांनी वर्ष १९६५ मध्ये, जनरल ह्याया खान यांनी वर्ष १९७१ मध्ये आणि जनरल मुशर्रफ यांनी वर्ष १९९९ मध्ये छेडलेले कारगिल युद्ध यांवरून त्यांची युद्ध करण्याची वृत्ती अन् युद्धाकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टीकोन लक्षात येतो. याचा परिणाम म्हणजे कित्येक जणांचे मृत्यू होतात आणि विनाश होतो. आता पाकिस्तानचे लष्कर आतंकवाद्यांचे साहाय्य घेत आहे. ‘लष्कर ए तोयबा’, ‘जमात ए इस्लामी’ इत्यादी आणि अनेक आतंकवादी संघटनांचा पाकिस्तानच्या समाजामध्ये मुक्तपणे वावर दिसून येतो अन् या संघटनांपैकी काही आतंकवादी पाकिस्तानी लष्करामध्ये भरती केले जातात.
अलीकडची घटना म्हणजे अण्वस्त्रे सिद्ध करणार्या पाकिस्तानच्या तळांवर झालेली हानी, हे पुढे काय होणार, याची नांदी आहे. रणनीतीच्या दृष्टीने सिद्ध करण्यात आलेली ही अण्वस्त्रे पाक आतंकवाद्यांना वापरण्यास देण्याची शक्यता अधिक आहे. जर ती अण्वस्त्रे आतंकवाद्यांच्या हातात पडली, तर त्यांचा वापर होण्याची शक्यता अधिक आहे. या आतंकवादी संघटनांची विचारधारा पहाता त्यांनी सौदी अरेबियाच्या आधुनिकीकरणाला विरोध केला. इराण किंवा सीरिया येथे शिया मुसलमान असल्याने तीही राष्ट्रे आतंकवाद्यांची लक्ष्य ठरू शकतात, तसेच इस्रायल, अमेरिका, युरोप आणि भारत यांनाही हे आतंकवादी लक्ष्य करू शकतात.
३. पाकची अण्वस्त्रे सिद्ध करण्याची क्षमता बंद करणे आवश्यक !
पाकिस्तानी लष्कराचे पाकवर असलेले प्रभुत्व आणि त्यांचे आतंकवादी संघटनांशी असलेले संबंध अन् काही उत्तरदायित्व नसणे यांमुळे संपूर्ण मानवतेला आण्विक आपत्तीला तोंड द्यावे लागू शकते. जगातील सर्व राष्ट्रांनी पाकिस्तानच्या विरोधात आवाज उठवून तेथील अण्वस्त्रे काढून घेतली जातील, याची खात्री केली पाहिजे, तसेच त्याची अण्वस्त्रे सिद्ध करण्याची क्षमता बंद केली पाहिजे. भारताच्या अंदाजानुसार पाकिस्तानकडे १७० हून अधिक अण्वस्त्रे आहेत. पाकिस्तानमधील लष्कराच्या चौक्या आणि हवाई अड्डे यांच्या छायाचित्रांचे विश्लेषण केले असता त्यामध्ये काही नवीन सुविधांचा समावेश दिसत आहे की, ज्या पाकच्या अण्वस्त्रविषयक उपक्रमाशी संबंधित असू शकतात.
– कर्नल सी.एम्. रामाकृष्णन् (निवृत्त)