Failure Of Copy-Free Campaign : जालना येथे २ परीक्षा केंद्रांवर मोठ्या संख्येने तरुणांनी कॉपी पुरवली !
पोलिसांनाही जुमानले नाही !
जालना – राज्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा चालू आहेत. जालना येथील परीक्षा केंद्रांवर बाहेरून कॉपी पुरवण्यात येत असल्याचे उघड झाले. कॉपी पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण आले होते. काही जणांनी शाळेच्या भिंतींवर चढून, तर काहींनी झाडावर चढून कॉपी पुरवल्या. जालना जिल्ह्यातील मंठा येथील रेणुका विद्यालय आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्या परीक्षा केंद्रांवर हा प्रकार घडला.
यामुळे परीक्षा केंद्रांवर कॉपी असणार्या कागदांचा खच पडला होता. प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त असतांनाही कॉपी पुरवण्यात आल्या. पोलिसांनी या तरुणांना हाकलण्याचा प्रयत्न केला; पण काहीही उपयोग झाला नाही.
संपादकीय भूमिका
|