रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर गदग (कर्नाटक) येथील कु. शिल्पा आर्. पसलादी यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
गदग (कर्नाटक) येथील कु. शिल्पा आर्. पसलादी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी आल्या होत्या. त्या वेळी त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये मला सर्व पुण्यक्षेत्रांचे दर्शन झाले, तसेच माझ्या साधनेचे बळ वाढले.
२. सेवेमुळे स्वभावदोष आणि अहं व्यक्त होण्याविषयी निरीक्षण होणे
‘मी आश्रमात स्वच्छतेची सेवा करतांना माझ्यातील स्वभावदोष आणि अहं कसे अन् कुठे प्रकट होतात ?’, हे माझ्या लक्षात आले.
३. ‘ध्येय ठेवून साधना केल्यास ती भावपूर्ण आणि परिपूर्ण होऊ शकते’, असे लक्षात येणे
एक साधिका मला ध्येय ठेवायला सांगून सेवा देत असे. तेव्हा ती सेवा भावपूर्ण होत होती. यावरून ‘मी ध्येय ठेवून साधना केली, तर साधना परिपूर्ण करू शकतो’, हे माझ्या लक्षात आले. आश्रमात माझ्याकडून प्रत्येक सेवा आनंदाने केली जात होती.
४. ‘आश्रमातील जीवनपद्धतीमुळे साधनेत प्रगती होऊ शकते’, अशी श्रद्धा निर्माण होणे
‘आश्रमातील जीवनपद्धती अंगीकारून त्यानुसार साधना केली, तर मीही साधनेत प्रगती करू शकते’, असे मला वाटले.
५. आश्रमातील संत आणि उन्नत साधक यांना पाहून साधनेत प्रगती करण्याची प्रेरणा मिळणे
आश्रमातील संत आणि उन्नत साधक यांना पाहिल्यावर ‘मीही असेच साधनेत पुढे गेले पाहिजे,’ असे मला वाटले.
आश्रमात मला सतत आनंद मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संत यांच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. शिल्पा आर्. पसलादी, गदग, कर्नाटक. (४.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |