‘स्वतःच्या हृदयात देव असून तोच सेवा करत आहे’, असे अनुभवणार्या देवद येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) महानंदा पाटील !
१. साधिकेच्या मनात ‘मला देवासारखे चार हात असते, तर…’ असा विचार येणे, तिला स्वतःच्या हृदयात देवाचे रूप दिसणे आणि ‘स्वतःच्या माध्यमातून देवच सेवा करतो’, असे तिला जाणवणे
‘२९.१.२०२१ या दिवशी संध्याकाळी मी सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करतांना अत्तराच्या बाटल्या ठेवायच्या खोक्यांवर ‘स्टॅम्प’ मारत होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘मला देवासारखे चार हात असते, तर…’(मला किती सेवा करता आला असती !) तेव्हा मला माझ्या हृदयात देवाचे रूप दिसले. ते रूप सनातन संस्थेच्या ‘परमेश्वर, ईश्वर, अवतार आणि देव’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर असलेल्या चित्रातील देवतेचे रूप होते. तेव्हा ‘माझ्या माध्यमातून देवच सेवा करतो’, असे मला जाणवले.
२. साधिकेला ‘किती सेवा करू !’ असे वाटणे आणि तिला सेवा करतांना उत्साह अन् आनंद जाणवणे
त्याच वेळी सहसाधिका मला म्हणाली, ‘‘तू ४ साधकांना खोके देतेस, म्हणजे तू एकाच वेळी चार साधकांना सेवा (खोक्यांवर स्टॅम्प मारून) सिद्ध करून देतेस.’ तेव्हा मी तिला म्हणाले, ‘‘हो. देवच सर्व करतो.’’ त्या वेळी मला ‘मी किती सेवा करू ! मला चार हात असते, तर मी चार हातांनी सेवा केली असती’, असे वाटले. तेव्हा मला पुष्कळ उत्साह आणि आनंद वाटत होता. तेव्हा ‘माझ्या हृदयात देव आहे आणि देवच ही सेवा पटापट करत आहे, असे मला जाणवले. मला वाटले, ‘मी सेवा करते’; मात्र देवाने माझ्याकडून सेवा करून घेतली. देवाने माझ्याकडून सेवा करून घेतली; म्हणून मी देवाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.’
– रामाची दासी,
सुश्री (कु.) महानंदा पाटील (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.१२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |