नेरळ (कर्जत, जिल्हा रायगड) येथील शास्त्रीय गायक श्री. धनंजय जोशी यांनी गीतरामायणातील एका भावगीताचे संस्कृत आणि मराठी भाषेत केलेल्या गायनाचे सूक्ष्म परीक्षण !
‘नेरळ (कर्जत, जिल्हा रायगड) येथील गायक श्री. धनंजय जोशी यांचे २ आणि ३ फेब्रुवारी २०२४ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात संगीताचे प्रयोग घेण्यात आले. श्री. धनंजय जोशी यांनी पहिल्या प्रयोगात गीतरामायणातील ‘स्वये श्रीराम प्रभु ऐकती…’ या भावगीताचे संस्कृत भाषेत आणि दुसर्या प्रयोगात मराठी भाषेत गायन केले. तेव्हा मला सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. गीतरामायणातील भावगीत संस्कृत आणि मराठी भाषांमध्ये ऐकतांना जाणवलेले सूक्ष्म स्तरावरील परिणाम
टीप १ – दोन्ही प्रयोगांत गायक श्री. धनंजय जोशी शब्दांचा अर्थ समजून, सुस्पष्ट उच्चारासह आणि सात्त्विक पद्धतीने (आलाप (टीप २) इत्यादींचा अत्यल्प वापर करून) गायन करत असल्यामुळे त्यांच्या गायनाचा परिणाम षट्चक्रांवर होत होता. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘षट्चक्रांपैकी कुठल्या चक्रावर सर्वाधिक परिणाम झाला’, ते येथे दिले आहे.
(टीप २ – रागदर्शक स्वरांचा संथ गतीने केलेला विस्तार म्हणजेच ‘आलाप’ होय. स्वरांचा उच्चार केवळ ‘आऽऽऽ’ कारात करणे, म्हणजे ‘आलाप’.)
२. प्रयोगातील अन्य काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
२ अ. गायकाने भाव ठेवून सात्त्विक गायन केल्यामुळे वाईट शक्तींचा त्रास असलेल्या आणि भाषा कळत नसलेल्या साधकांवरही आध्यात्मिक परिणाम होणे : श्री. जोशी यांनी श्रीरामाप्रतीच्या भावाने गीतरामायणातील संस्कृत आणि मराठी भाषेतील भावगीत यांचे एकदाही आलाप, स्वरविस्तार (टीप ३) इत्यादी न करता त्याचे गायन केले. यामुळे गायनात पुष्कळ चैतन्य कार्यरत झाले होते. त्या चैतन्याचा परिणाम वाईट शक्तींचा त्रास असलेल्या आणि त्या भाषा कळत नसलेल्या साधकांच्याही अंतर्मनापर्यंत झाला. वाईट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांचा देह, मन आणि बुद्धी यांवर काळ्या शक्तीचे दाट आवरण असते, त्यामुळे त्यांच्या अंतर्मनावर क्वचित्च परिणाम होतो. या प्रयोगात सहभागी झालेल्या काही साधकांना भाषा कळत नसूनही त्यांचा भाव जागृत झाला होता. यांतून सध्या समाजात प्रचलित आलाप, स्वरविस्तार न करता सात्त्विक पद्धतीने आणि भाव ठेवून गायन करण्याचे सूक्ष्म स्तरावरील परिणाम लक्षात आले.
टीप ३ – रागातील स्वरांच्या वेगवेगळ्या रचना तीनही सप्तकांतून क्रमाक्रमाने करून रागाचे स्वरूप स्पष्ट करणे
२ आ. मराठीतून गीतरामायणाचे गायन करतांना श्री. धनंजय जोशी यांचा अष्टसात्त्विक भाव जागृत होणे : गायक श्री. जोशी यांनी पहिल्या प्रयोगात संस्कृत भाषेत, तर दुसर्या प्रयोगात मराठी भाषेत गीतरामायणातील भावगीताचे गायन केले. तेव्हा मला सूक्ष्म ज्ञानातून पुढील टक्केवारी प्राप्त झाली.
मला सूक्ष्मातून हे ज्ञान मिळाले आणि प्रत्यक्षातही तशाच अनुभूती श्री. धनंजय जोशी यांना आल्या. संस्कृत भाषेत गीतरामायणातील भावगीताचे गायन करतांना त्यांनी पूर्ण वेळ पुष्कळ आनंद अनुभवला आणि मराठी भाषेत गीतरामायणातील भावगीताचे गायन करतांना त्यांना आनंद होत होताच; पण व्यासपिठावरून खाली उतरतांना त्यांना त्यांच्या ‘पूर्ण शरिरात कंप भरला आहे’, असे जाणवले. त्यामुळे काही वेळ त्यांना बसावे लागले. ‘शरिराला कंप सुटणे’, हे अष्टसात्त्विकभाव जागृत झाल्याचे एक लक्षण आहे. त्याची त्यांना आलेली ही अनुभूती होती.
२ इ. गायकाने स्वेच्छा न ठेवता गायनाशी एकरूपता साध्य केल्यास त्याला संगीतातील ऊर्जेची अनुभूती येणे : श्री. जोशी यांना अशा अनुभूती येण्यामागील कारण म्हणजे त्यांनी स्वेच्छाप्रधान गायन न करता भाव ठेवून गीतातील शब्द आणि त्यांचा अर्थ यांच्याशी एकरूपता साध्य केली. त्यामुळे ते त्या संगीतात दडलेल्या ऊर्जेची, म्हणजे शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची अनुभूती घेऊ शकले. ‘यातून आध्यात्मिकदृष्ट्या संगीतही स्वेच्छेच्या तुलनेत परेच्छेने, म्हणजे रचनाकाराने केलेल्या रचनेनुसार गायल्यास त्याचे आध्यात्मिक परिणाम अधिक होतात’, हे शिकता आले.
२ ई. संस्कृत आणि मराठी दोन्ही भावगीतांचे गायन करतांना समप्रमाणात श्रीरामतत्त्व आणि श्रीरामलोक निर्माण झाल्याचे जाणवणे : श्री. जोशी यांनी गीतरामायणातील ‘स्वये श्रीराम प्रभु ऐकती…’ हे भावगीत संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषांत गायले. या दोन्ही प्रयोगांत मला ‘सम प्रमाणात श्रीरामतत्त्व आणि स्वर्गलोकाला समांतर असलेल्या श्रीरामलोकाचे वायूमंडल निर्माण झाले’, असे जाणवले. तसेच दोन्ही प्रयोगांत श्री. जोशी यांच्याभोवती भावाची निळ्या रंगाची प्रभावळ एकसारखीच दिसली. असे या पूर्वी मी कधीच अनुभवले नव्हते. या संदर्भात मला जाणवले, ‘देवाला भाषेचे बंधन नसते.’ श्री. जोशी यांनी ते भावगीत दोन्ही भाषांत श्रीरामाप्रती भाव ठेवून सादर केले. यामुळे दोन्ही भावगितांच्या सादरीकरणात समप्रमाणात श्रीरामतत्त्व आणि श्रीरामलोक निर्माण झाल्याचे जाणवले.’ यांतून आध्यात्मिकदृष्ट्या भाषेला फारसे महत्त्व नसून भावालाच सर्वाधिक महत्त्व असून ‘भाव तिथे देव’ हे तत्त्व अनुभवता आले.’
३. कृतज्ञता
भगवान श्रीराम आणि श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने हे सूक्ष्म परीक्षण करता आले. यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०२४, संध्याकाळी ६.५० ते रात्री ७.१२ आणि रात्री ७.३० ते ८.५०)
|