मंत्रालय आणि विधीमंडळ यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
मुंबईत धनगर आरक्षणासाठी मोर्चा
मुंबई – या अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या संख्येने यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांना अडवून मंत्रालय आणि विधीमंडळ येथपर्यंत जाऊ दिले नाही. आझाद मैदानावर या मोर्चेकर्यांना जायचे होते. मराठा आरक्षणाप्रमाणे याच अधिवेशनात धनगरांनाही आरक्षण देण्याची आग्रही मागणी घेऊन ते आक्रमक झाले होते.