‘महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक २०२४’ संमत झाले !
मुंबई – पोलिसांच्या बदल्यांत पोलीस दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान आणि मोटर परिवहन विभाग यांचा समावेश करणारे ‘महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक २०२४’ हे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी मांडले आणि ते विधान परिषदेत संमत झाले. याविषयी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले की, महामार्ग पोलिसांना बसण्यासाठी कार्यालय नाही, टपर्यांमध्ये ते बसतात, तेथे पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात.
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले की, पोलिसांचे ३ विभाग एकत्र करून पोलीस एस्टाब्लिशमेंट विभाग केला आहे, हे चांगले आहे; मात्र पोलिसांची पदे भरणे आवश्यक आहे, ते भरले जात नाही.