पोरबंदर (गुजरात) किनार्यावरून ३ सहस्र ३०० किलो अमली पदार्थ जप्त !
|
कर्णावती (गुजरात) – येथील समुद्री किनार्यावरून ३ सहस्र ३०० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यांचे मूल्य २ सहस्र कोटी रुपयांहून अधिक असून त्यांची तस्करी करणार्या इराणी नौकेतील ५ विदेशी व्यापार्यांनाही अटक करण्यात आली आहे. हे व्यापारी इराणी किंवा पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आतंकवादविरोधी पथक, नौदल आणि ‘दिल्ली अमली पदार्थ नियंत्रण विभाग’ यांच्या संयुक्त मोहिमेच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
Joint operation of the Indian Navy and Narcotics Control Bureau.
Seize around 3300 kg of drugs from the Porbandar (Gujarat) coast; biggest offshore seizure of drugs in India
➡️ Estimated value of the seized substances is over 2 thousand crore rupees.
➡️5 foreign nationals were… pic.twitter.com/TIeeZWAoom
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 28, 2024
गीर सोमनाथ पोलिसांनी ५ दिवसांपूर्वीच ३५० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. तेव्हापासून संबंधित तस्करांना पकडण्यासाठी संयुक्त कारवाई चालू होती. यांतर्गत सागरी सीमेवरून अमली पदार्थांची ही आतापर्यंतची सर्वांत मोठी जप्ती आहे.