संपादकीय : नावातच सर्वकाही आहे !
गालमधील सिलीगुडीमध्ये असणार्या अभयारण्यातील ‘अकबर’ नावाच्या सिंहाला ‘सीता’ नावाच्या सिंहिणीसमवेत ठेवण्यावरून मोठा गदारोळ झाला. या पार्श्वभूमीवर धार्मिक भावना दुखावल्यामुळे विहिंपच्या कार्यकर्त्यांनी थेट कोलकाता उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायमूर्तींनीही हिंदूंच्या धार्मिक भावनांची नोंद घेऊन सिंहाला ठेवलेले ‘अकबर’ आणि सिंहिणीला ठेवलेले ‘सीता’ हे नाव पालटण्याचा आदेश दिला. या निकालाचा एवढा परिणाम झाला की, प्राण्यांनाही नावे ठेवणार्या वन अधिकार्याला निलंबित करण्यात आले. यामुळे हिंदूंनी समाधान व्यक्त केले. उच्च न्यायालयानेच निकाल दिल्यामुळे पुरो(अधो)गाम्यांना नेहमीप्रमाणे हिंदूंना उपदेशाचे डोस पाजता येईना. मग त्यांनी हिंदुद्वेषाची खदखद वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर काढण्यास आरंभ केला. एका प्रथितयश इंग्रजी दैनिकाने तर ‘याआधीही प्राणी संग्रहालयांमध्ये भिन्न धर्मियांची नावे असलेल्या सिंह-सिंहिणींना एकत्र ठेवतांना कसा सर्वधर्मसमभाव जोपासला जात होता आणि त्याविषयी आक्षेप का घेतला नाही ?’, याची उदाहरणे दिली. हिंदु किंवा मुसलमान यांच्या श्रद्धास्थानांची नावे प्राण्यांना ठेवण्यावर कोलकाता उच्च न्यायालयाने आक्षेप नोंदवला. त्यामुळे ‘याआधी ज्या प्राण्यांना हिंदूंच्या देवतांची नावे देण्यात आली, त्यांची नावे पालटणार का ?’, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. पुरो(अधो)गाम्यांनी या पूर्ण प्रकरणात न्यायालयाच्या निकालाची खिल्ली उडवून ‘हा आदेश बुरसटलेल्या मनोवृत्तीतून देण्यात आला आहे’, असे भासवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ‘जर या प्रकरणात मुसलमानांनी याचिका प्रविष्ट केली असती, तर निधर्मीवाद्यांची भूमिका अशीच असती का ?’, हा प्रश्न केवळ सिंह आणि सिंहिणी यांच्या नावापुरता मर्यादित नाही, तर हा हिंदूंच्या अस्मितेचा विषय आहे.
नावात काय आहे ?
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली यांनी त्यांच्या मुलाचे ‘अकाय’ असे नामकरण केल्याची माहिती समाजमाध्यमांतून प्रसारित झाली. त्यानंतर भारतात अनेकांनी ‘अकाय’ या शब्द ‘गूगल’वर सर्च केला. ही घटना येथे नमूद करण्याचे कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीचे नाव, तिचा अर्थ किंवा त्या नावामागील गौरवशाली इतिहास जाणून घेण्याची समाजाची स्वाभाविक मनोवृत्ती ही एखाद्याचे नाव हे एखाद्याच्या राष्ट्राच्या, समूहाच्या किंवा घराण्याच्या अस्मितेशीही जोडलेले असू शकते. त्यामुळे पाश्चात्त्यांप्रमाणे ‘नावात काय आहे ?’, हा प्रश्न हिंदूंना कुणी विचारू नये. ‘अकबर’ आणि ‘सीता’ प्रकरणात काही उपटसुंभांनी ही भूमिका मांडली होती. ‘सीता’ हे नाव पावित्र्य, चारित्र्यसंपन्नता, त्याग यांचे द्योतक आहे. अकबर हा बलात्कारी असल्यामुळे त्याचे उदात्तीकरण करणारे धडे राजस्थानमधील शाळांच्या अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. अकबराच्या हिंदुद्वेषी कारवाया लपवून त्याला ‘सर्वधर्मसमभावा’चा प्रतिनिधी म्हणून रंगवण्याचे लाख प्रयत्न झाले, तरी हिंदू त्याला बधणार नाहीत. त्यामुळे ‘अकबर’ आणि ‘सीता’ यांची जोडी जुळवण्याचा खटाटोप कुणी करत असेल, तर हिंदू यापुढे बघ्याची भूमिका घेणार नाहीत. कुठल्याही माध्यमातून हिंदूंची अस्मिता दुखावण्याचा कुणी प्रयत्न केला, तर हिंदू त्याला विरोध करणारच. सध्या ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदु युवतींचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र रचले जात असतांना सजग हिंदु समाज ‘सीता’ आणि ‘अकबर’ यांना एकत्र केलेले कदापिही सहन करणार नाही.
आजही जन्माला आलेल्या बाळाची पत्रिका पाहून, त्याची जन्मरास काढून त्यानुसार नामकरण करण्याची परंपरा बहुतांश हिंदूंमध्ये पाळली जाते. पूर्वीच्या पिढ्यांमध्ये मुलांची नावे ही हिंदूंच्या देवतांवरून ठेवण्याची पद्धत होती. बहुतांश हिंदु समाज हा सश्रद्ध असल्यामुळे कुणी त्यांच्या मुलाचे नाव कधी ‘रावण’ किंवा ‘दुर्याेधन’, तसेच मुलीचे नाव ‘शूर्पणखा’ किंवा ‘पुतना’ ठेवते का ?
अकबरही नको आणि तैमूरही नको !
त्रिपुरा येथील आय.एफ्.एस्. अधिकारी प्रवीण लाल अग्रवाल यांनी सिंह आणि सिंहीण यांचे नामकरण केले होते. त्यांना निलंबित केल्यावर निधर्मीवाद्यांनी हळहळ व्यक्त केली. सिंह आणि सिंहीण यांना एकत्र ठेवण्याचे निश्चित झाल्यावर त्यांना वेगवेगळ्या धर्मांचे प्रतिनिधित्व करणारी नावे ठेवण्यामागील अग्रवाल यांची मनोभूमिका काय होती ? ‘काही गोष्टी किंवा कृती आपण सहज करत असतो. प्रत्येक कृती करतांना त्यामागे एखादा उद्देश किंवा हेतू असतोच असे नाही’, असे सांगून कुणी अग्रवाल यांनी केलेल्या कृत्यावर पांघरूण घालू नये. ‘अकबर’ आणि ‘सीता’ यांना एकत्र आणल्याचे कळल्यावर जशी हिंदूंच्या तळपायाची आग मस्तकात गेली, तशी भावना अग्रवाल यांच्यात का निर्माण झाली नाही ? प्रशासनात खोलवर रूतलेली ही निधर्मी मनोवृत्तीच याला उत्तरदायी आहे. प्रशासनाच्या या मनोवृत्तीमुळे हिंदु समाजाची पुष्कळ हानी झाली. त्यामुळे ही मनोवृत्ती पालटण्याचे दायित्व सरकारचे आहे.
भिन्न धर्मियांची नावे प्राण्यांना ठेवून त्यांना एकत्रित ठेवण्याचे हे काही पहिले प्रकरण नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. जसे की गुजरातमधील प्राणी संग्रहालयामध्ये ‘राम’ सिंहाची जोडी ‘मुमताज’शी, तर मध्यप्रदेशातील प्राणी संग्रहालयातील ‘मोहन’ सिंहाची जोडी ‘बेगम’ सिंहीणीशी जुळवण्यात आली. निधर्मीवाद्यांनी प्राण्यांच्या नामकरणाचा हा सगळा इतिहास बाहेर काढून वन विभागामध्ये कसा सर्वधर्मसमभाव जोपासला जात आहे, याचा पाढा वाचला आहे. थोडक्यात ‘अकबर’ आणि ‘सीता’ प्रकरणात जागे झालेले हिंदू त्या वेळी कुठे होते ?’, असा हिंदूंना जाब विचारला जात आहे. त्या वेळी सर्वधर्मसमभावाचा पगडा असलेल्या हिंदूंनी हा प्रकार चालवून घेतला; म्हणून तो आताही घ्यायला हवा, असा नियम नाही. आता जागृत झालेले हिंदू असली थेरं खपवून घेणार नाहीत.
काही वर्षांपूर्वी अभिनेते सैफ अली खान पतौडी आणि त्यांची पत्नी करीना कपूर यांनी त्यांच्या मुलाचे नाव ‘तैमूर’ ठेवले होते. त्या वेळी त्यांच्यावर टीका झाली होती. हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्यांची नावे स्वतःच्या मुलाला ठेवून हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळण्याच्या या मनोवृत्तीला कुठे तरी आळा हा बसलाच पाहिजे. जर्मनीतील समाज क्रूरकर्मा ॲडॉल्फ हिटलरचे नाव त्यांच्या मुलांना ठेवत नाही, मग हिंदु समाजाने ‘बाबर’, ‘औरंगजेब’, ‘तैमूर’, ‘अकबर’, ‘हुमायू’ ही नावे का खपवून घ्यायची ? हिंदु समाजाची काही श्रद्धास्थाने आहेत. त्यात सीता ही श्रीरामाचीच असणार आहे. तिचे नाव बलात्कारी असलेल्या अकबराशी जोडण्याचा कुणी अश्लाघ्य प्रयत्न केला, तर हिंदू त्याला प्रत्युत्तर देतील, हे निश्चित !
हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजणार्या निधर्मीवाद्यांचे वैचारिक खंडण करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य ! |