Nepali Youths In Russian Army : रशियन सैन्यात भरती झालेल्या नेपाळी तरुणांना परत आणण्यासाठी प्रयत्न करणार ! – नेपाळचे परराष्ट्रमंत्री

नारायण प्रकाश सौद

काठमांडू – नेपाळचे परराष्ट्रमंत्री नारायण प्रकाश सौद यांचे रशियन सैन्यात भरती झालेल्या नेपाळी तरुणांविषयीचे वक्तव्य समोर आले आहे. ‘रशियातील सर्व नेपाळी तरुणांना मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार’, असे आश्‍वासन सौद यांनी रशियन सैन्यात भरती झालेल्या नेपाळी नागरिकांच्या कुटुंबियांशी संवाद साधतांना केले.

सौजन्य : Al Prime Roport

१. २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध चालू झाल्यापासून शेकडो नेपाळी नागरिक रशियन सैन्यात सामील झाले आहेत. या युद्धात रशियाच्या वतीने लढतांना आतापर्यंत १२ नेपाळी नागरिकांनी प्राण गमावले आहेत.

२. सौद म्हणाले की, आतापर्यंत सरकारला रशियन सैन्यात भरती झालेल्या २४४ नेपाळी नागरिकांच्या कुटुंबियांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. ते म्हणाले की, सरकार रशियाच्या संपर्कात आहे आणि रशियातून या नेपाळी नागरिकांना परत पाठवण्याविषयी चर्चा चालू आहे.