सायबर गुन्ह्यातील महिला आरोपीचे पलायन !
पुणे – फसवणूक प्रकरणात हरियाणातून कह्यात घेऊन पुणे येथे आणतांना महिला आरोपीने रेल्वेतून पलायन केल्याची घटना उघड झाली आहे. राजस्थान येथील कोटा शहराजवळ नागदा स्थानकात सिग्नल लागल्यावर महिला आरोपी पोलिसांना चुकवून पसार झाली. सादिया सिद्दिकी असे पसार झालेल्या महिला आरोपीचे नाव आहे. सादियाविरुद्ध ऑनलाईन फसवणूक प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
संपादकीय भूमिकाअशी कुचकामी पोलीसयंत्रणा सुधारणार कधी ? |