Saudi Arabia Bans Iftar : सौदी अरेबियात मशिदींमध्ये इफ्तारच्या आयोजनावर बंदी, तसेच अजानच्या आवाजावरही नियंत्रण !
रमजानशी संबंधित नियमांमुळे कट्टरतावाद्यांमध्ये नाराजी
रियाध (सौदी अरेबिया) – इस्लामी राष्ट्र सौदी अरेबियाने रमजान महिन्यात मशिदींमध्ये इफ्तार पार्टीच्या आयोजनावर बंदी घातली आहे. सौदी अरेबिया सरकारने म्हटले आहे की, मशिदींमध्ये कोणताही इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा) इफ्तारचे आयोजन करणार नाही. यासोबतच इफ्तारसाठी देणगी घेणार्यावरही बंदी घालण्यात आली आहे. नवीन नियमानुसार रमझानच्या काळात मशिदीतून ध्वनीक्षेपकावरून देण्यात येणार्या अजानच्या आवाजावरही नियंत्रण ठेवण्यात आले आहे. मशिदींमध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेर्यांद्वारे तेथील प्रार्थनेचे थेट प्रक्षेपण करू नये, असा आदेशही सरकारच्या इस्लामी व्यवहार मंत्रालयाने दिला आहे. भिकार्यांना मशिदींमध्ये भीक मागण्यापासून रोखावे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. येत्या ११ मार्चपासून रमजान महिना चालू होणार आहे. या निर्णयामुळे सौदीतील कट्टरतावादी नाराज झाले आहेत.
मशिदी अस्वच्छ होत असल्याने घेतला निर्णय !
सौदी अरेबियाच्या इस्लामी व्यवहार मंत्रालयाने एक आदेश जारी करून आगामी रमजान महिन्याविषयी काही सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. सौदी अरेबियातील सर्व मशिदी या मंत्रालयाच्या नियंत्रणात आहेत. रोजा संपल्यानंतर संध्याकाळी आयोजित केल्या जाणार्या इफ्तारमुळे मशिदींच्या स्वच्छतेवर परिणाम होतो, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
सौदी अरेबियामध्ये आधुनिकतेला प्राधान्य
इस्लामचा प्रारंभ सौदी अरेबियात झाला; मात्र अलीकडच्या काळात येथे इस्लामी नियम शिथील करण्यात आले आहेत. सध्याचे पंतप्रधान आणि सौदी अरेबियाचे युवराज महंमद बिन सलमान यांनी आधुनिक विचारसरणीला बाधा पोचवणारे अनेक नियम रहित केले आहेत. यामध्ये महिलांना गाडी चालवण्याची अनुमती देण्यासारख्या अनेक निर्णयांचा समावेश आहे.
संपादकीय भूमिकाजर इस्लामचे माहेरघर असलेला सौदी अरेबिया मशिदींच्या संदर्भात असे कठोर निर्णय घेऊ शकतो, तर ‘धर्मनिरपेक्ष’ भारतात राष्ट्रविघातक कारवाया चालू असलेल्या बहुतांश मशिदींवर कारवाई करायला भारत सरकारला अडचण येऊ नये ! |