समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर बर्क यांचे ९४ व्या वर्षी निधन !
संभल (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रहमान बर्क यांचे २७ फेब्रुवारी या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. अनुमाने २० दिवसांपूर्वी मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे त्यांना मुरादाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांचा राजकीय प्रवास वर्ष १९७४ मध्ये चालू झाला होता. डॉ. बर्क हे संसदेतील सर्वांत वयस्कर खासदार होते. ते उत्तरप्रदेशमधील एक मोठे मुसलमान नेते म्हणून ओळखले जात. ते ५ वेळा खासदार आणि ४ वेळा आमदार होते.
सौजन्य News18 MP Chhattisgarh
शफीकुर रहमान बर्क यांचा भारतद्वेष आणि हिंदु द्वेष, तसेच इस्लामप्रेम !
१. श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर बर्क म्हणाले होते की, आमची (बाबरी) मशीद बळजोरीने पाडण्यात आली. ते मानवतेच्या विरोधात होते. मी अल्लाकडे प्रार्थना करतो की, आम्हाला आमची बाबरी मशीद परत मिळावी.
२. वर्ष २०१९ मध्ये लोकसभेत शपथग्रहण समारोहाच्या वेळी बर्क यांनी वन्दे मातरम् हे इस्लामविरोधी असल्याचे सांगत ते म्हणणे टाळले होते.
३. त्यांनी नुकत्याच चालू झालेल्या नव्या संसदेमध्ये नमाजपठणाची मागणी केली होती.
४. ज्ञानवापीमध्ये शिवलिंग नाही, असे ते हल्लीच म्हणाले होते.
५. ‘हमास ही आतंकवादी संघटना नाही’, असे त्यांनी म्हटले होते.
६. बर्क यांनी वर्ष २०२२ मध्ये अफगाणिस्तानात स्थापित झालेल्या तालिबानी सत्तेचे समर्थन केले होते.