युद्धाला सिद्ध असणार्या रथारूढ श्रीकृष्णार्जुनाचे चित्र निर्गुणाकडे जात असल्याचे जाणवणे
१. श्रीकृष्णार्जुनाच्या चित्राविषयी निर्गुण तत्त्वाची अनुभूती येणे
‘गेल्या ८ वर्षांपासून माझ्या पुणे येथील घरी श्रीकृष्णार्जुनाचे रथारूढ चित्र भिंतीवर लावलेले आहे. ‘या छायाचित्रामध्ये हळूहळू पालट होत आहेत’, असे जाणवत होते. ‘आता ते चित्र निर्गुणाकडे जात आहे’, असे मला वाटते. ‘ज्या खोलीत हे चित्र लावले आहे, त्या खोलीत अतिशय शांत वाटते आणि नामजप आपोआपच होतो’, असे माझ्या लक्षात आले. त्या खोलीतील चैतन्यातही वाढ झाल्याचे जाणवते.
२. काही जणांनी ‘श्रीकृष्णार्जुनाच्या चित्राकडे पाहून चांगले वाटते’, असे सांगितले.’
– डॉ. प्रवीण मेहता (वय ६७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |