Akbar Seeta Official Suspended : ‘अकबर-सीता’ असे सिंह-सिंहिणीच्या जोडीचे नाव ठेवणारा वन विभागाचा अधिकारी निलंबित !
त्रिपुरा सरकारने केली कारवाई !
अगरताळा (त्रिपुरा) – त्रिपुरा राज्यशासनाने राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव आणि निसर्ग पर्यटन) प्रबिन लाल अगरवाल यांना निलंबित केले आहे. प्राणी संग्रहालयातील सिंह-सिंहिणीच्या जोडीचे नाव ‘अकबर’ आणि ‘सीता’ ठेवल्याला विरोध झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. विश्व हिंदु परिषदेने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत कोलकाता उच्च न्यायालयाच्या जलपाईगुडी खंडपिठात या प्रकरणी याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. यानंतर त्रिपुराच्या भाजप शासनाने संबंधित अधिकार्याला निलंबित केले.
The Forest Department official who named the lion pair as 'Akbar and Sita' has been suspended !#Tripura government takes action !#Sita#Lions #Conversion #ForestOfficer #wildlife
Picture Courtesy – @timesofindia pic.twitter.com/fPHbW3EzUb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 26, 2024
सिंह आणि सिंहिणीच्या जोडीला त्रिपुरामधील सेपाहीजला प्राणी संग्रहालयातून सिलीगुडी येथील ‘उत्तर बंगाल वन्यजीव पार्क’मध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. त्रिपुराच्या वन्यजीव विभागाचे प्रमुख म्हणून काम करत असतांना अगरवाल यांनी वरीलप्रकारे सिंह-सिंहिणीच्या जोडीचे नाव ठेवल्याची कागदोपत्री नोंद आहे. त्यावरून राज्यशासनाने कारवाई केली.