शरद पवार गटाच्या ९ कार्यकर्त्यांवर पुणे येथे गुन्हा नोंद !

अजित पवार यांच्या नावाच्या कोनशिलेची फरशी काढून गोंधळ घातल्याचे प्रकरण !

पुणे – अजित पवार यांनी ७ मासांपूर्वी राष्ट्रवादीत बंडखोरी केली होती. पक्षातील प्रमुख नेत्यांना समवेत घेऊन ते भाजप – शिंदे गटाच्या सरकारमध्ये सामील झाले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्हही अजित पवारांना सोपवले होते. या घटनेच्या निषेधार्थ प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. शिवाजीनगर येथील पक्षाच्या कार्यालयातील अजित पवार यांच्या नावाची कोनशिलाही या वेळी हातोडीने फोडून टाकण्यात आली. या प्रकरणी अजित पवार गटाच्या लावण्या शिंदे यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह ९ जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सौजन्य सकाळ