श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानाच्या अध्यक्षपदी वैभव काळू पुजारी यांची निवड !
नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) – भारतभरातील कोट्यवधी दत्तभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि श्री नृसिंह सरस्वतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील ‘श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थाना’च्या अध्यक्षपदी श्री. वैभव काळू पुजारी, तसेच सचिवपदी श्री. संजय तथा सोनू पुजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड विश्वस्तांच्या बैठकीत करण्यात आली. या प्रसंगी माजी अध्यक्ष श्री. संतोष खोंबारे-पुजारी, विश्वस्त सर्वश्री संजय नारायण पुजारी, सदाशिव जेरे-पुजारी, पांडुरंग रुके-पुजारी, गजानन गेंडे-पुजारी, आनंद पुजारी उपस्थित होते.
नूतन अध्यक्ष श्री. वैभव काळू पुजारी म्हणाले, ‘‘दत्त देव संस्थानाच्या माध्यमातून यात्रेकरू आणि भाविक यांना विविध, तसेच आधुनिक सेवा-सुविधा पुरवून विकासासाठी प्रयत्न करू. वयस्कर, तसेच लहान मुलांना दर्शन घेतांना येणारी पायर्यांची तांत्रिक अडचण लक्षात घेऊन उंच रचना लवकरच अल्प करण्यात येईल. देवस्थानाच्या जागेत २५० खोल्यांचे भक्तनिवास कामाचा प्रारंभ लवकरच करू.’’