प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याविषयी सनातन संस्थेच्या वतीने सदिच्छा भेट !
पुणे – कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभेवर संधी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध झाल्याने त्या आता खासदार झाल्या आहेत. प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याविषयी २१ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी म्हणजे कोथरूड येथील ‘सात्यकी’ बंगल्यावर भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने त्यांना ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. नीता साळुंके, सौ. प्रीती कुलकर्णी आणि श्री. नारायण पाटील उपस्थित होते.