कु. अवनी छत्रे यांना आलेल्या अनुभूती
१. गुरुदेवांच्या सत्संगात आलेल्या अनुभूती
१ अ. गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) मार्गदर्शन लिहिलेल्या वहीला सुगंध येणे : ‘एकदा गुरुदेवांच्या सत्संगात त्यांचे मार्गदर्शन लिहिण्यासाठी मी जी वही नेली होती, तिचे प्रत्येक पान आणि बाहेरील वेष्टन सुगंधी झाले आहे’, असे मला घरी आल्यावर जाणवले.
१ आ. गुरुदेवांच्या सत्संगात सुगंध येणे : गुरुदेवांच्या सत्संगात काही प्रयोग करून घेण्यात आले. तेव्हा मला सुगंधाची अनुभूती आली. हा सुगंध त्यांच्या सत्संगात अन्य वेळी अनुभवला होता. अन्य कोणत्याही ठिकाणी असा कोणताही सुगंध मला अनुभवता येत नाही.
२. शिबिरात काही अडचण किंवा प्रश्न न विचारताही त्याची उत्तरे मिळणे
आश्रमात झालेल्या एका शिबिरात अडचणी किंवा प्रश्न विचारण्यासाठी वेळ दिला होता. तेव्हा बर्याच साधकांना बोलण्याची इच्छा होती. त्या वेळी माझ्या मनात ‘त्यांना संधी मिळाली पाहिजे आणि वेळ अल्प आहे’, असा विचार आला. मी गुरुदेवांना आत्मनिवेदन केले. तेव्हा मला अशी अनुभूती आली की, ‘शिबिरातील वक्त्यांनी कुणीही न विचारता माझ्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे सांगितली आणि काही प्रश्नांची उत्तरे गुरुदेवांनी मला मनात विचार देऊन दिली.’
– कु. अवनी छत्रे, बांदोडा, फोंडा, गोवा.
|