आत्म परमात्मदेवाचे परम ज्ञान
‘विवेकाने पाहिले, तर बालपण स्वप्न झाले, तारुण्यावस्था स्वप्न झाली, कालची गोष्टही स्वप्न झाली आणि आजची प्रवृत्तीही थोड्या वेळाने स्वप्न होऊन जाईल. सर्व पालटत चालले आहे. स्वप्न होत चालले आहे; परंतु या सर्वांना पहाणारा द्रष्टा, साक्षी, चैतन्य एकच आहे आणि तोच वास्तविक सत्य आहे. तुम्ही यथायोग्य त्या तत्त्वात टिकलात, तर बाहेरून युद्ध करतांनाही, आतून शांत रहाल, असे ते परम ज्ञान आहे आत्म परमात्मदेवाचे !’
(संदर्भ : लोक कल्याण सेतू, डिसेंबर २०२१)