मुंबई येथे ‘ऑनलाईन’ वरसंशोधनातून शिक्षिकेची २१ लाख रुपयांची फसवणूक !

मुंबई – विवाह जुळवणार्‍या संकेतस्थळावरून ओळख झाल्यानंतर भाग्यनगर (हैद्राबाद) येथील धर्मांध इम्रानअली याने येथील सायरा या शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला विवाहाचे प्रलोभन दाखवले. या या शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला विवाहाचे प्रलोभन दाखवले. या धर्मांधाने शिक्षिकेकडून वेगवेगळी कारणे सांगून तब्बल २१ लाख ७३ सहस्र रुपये लाटले आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या शिक्षिकेने पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

१. शिक्षिकेने एका विवाह जुळवणार्‍या संकेतस्थळावर नोंदणी केली होती.

२. त्यांचे प्रोफाईल पाहून इम्रानअली खानने त्यांना मित्र होण्याची विनंती पाठवली होती.

३. काही दिवसांनी डोंगरी येथील एका उपाहारगृहात इम्रानअली याने त्यांना भेटण्यासाठी बोलावले. तो त्यांच्याशी विवाह करणार असल्याचे सांगितले.

४. त्यानंतर ‘विवाहाची मेजवानी द्यायची आहे’ असे सांगून त्याने शिक्षिकेकडून १ सहस्र रुपये घेतले.

५. ‘खोली खरेदी करायची असून १० लाख रुपये दे’, असे सांगितले.

६. त्यानंतर ‘वनभूमीवर अतिक्रमण केल्यामुळे पोलिसांनी इम्रानअली याला अटक केली असून त्याच्या सुटकेसाठी पैसे हवेत’, असे त्याच्या मित्राने कळवले.

७. अशा प्रकारे वेगवेगळी कारणे सांगून इम्रानअली याने त्या शिक्षिकेकडून वरील रक्कम घेतली.