साधना करतांना अध्यात्मशास्त्राचे महत्त्व !
‘अध्यात्मशास्त्र म्हणजे ईश्वरप्राप्तीच्या संदर्भातील तात्त्विक माहिती, तर साधना म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी करावयाच्या कृती. त्यामुळे काही जणांना प्रश्न पडतो की, ‘प्रत्यक्ष कृती करणे, म्हणजे साधना करणे महत्त्वाचे असतांना अध्यात्मशास्त्र किती महत्त्वाचे असते?’ त्याचे उत्तर म्हणजे, साधना करतांना ईश्वरप्राप्तीच्या टप्प्याला जाईपर्यंत साधकाला अनेक अनुभूती येतात. या अनुभूतींबद्दल त्या साधकाला अनेक प्रश्न असतात. या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर, म्हणजे त्याच्या जिज्ञासेची पूर्तता झाल्यावर तो पुढील साधना अधिक उत्साहाने करू लागतो. ही जिज्ञासा पूर्ण करण्याचे कार्य अध्यात्मशास्त्र करते. त्यामुळे अध्यात्मशास्त्र हे साधनेसाठी साहाय्यकच ठरते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले